Join us

लाल टोपी घातलेला चिमुकला गाजवतोय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', पैज लावली तरी ओळखता येणार नाही

By कोमल खांबे | Updated: April 7, 2025 11:03 IST

सेलिब्रिटींचे इंडस्ट्रीत येण्याअगोदरचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील एका कलाकाराचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

आपले आवडते कलाकार लहानपणी कसे दिसायचे? काय करायचे? याबरोबरच त्यांच्या कुटुंबात कोण कोण असतं, याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सेलिब्रिटींचे इंडस्ट्रीत येण्याअगोदरचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील एका कलाकाराचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेता त्याच्या भावासोबत उभा असल्याचं दिसत आहे. फोटोतील दोन्ही चिमुकल्यांनी टोपी घातली आहे. यातील लाल टोपी घातलेला चिमुकला सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो गाजवत आहे. पण, फोटो पाहून त्याला ओळखणं खूपच कठीण आहे. "दो भाई दोनो तबाही", असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. 

फोटोत दिसणारा हा चिमुकला म्हणजे अभिनेता पृथ्विक पाटील आहे. पृथ्विक पाटील सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. त्याने याआधी काही मालिकांमध्ये काम केलं आहे. जागो मोहन प्यारे, पोस्ट ऑफिस या मालिकांमध्ये तो दिसला होता. त्याबरोबरच 'फुलवंती', 'डिलिव्हरी बॉय', 'कर्मयोगी आबासाहेब' या सिनेमांमध्ये तो झळकला आहे. पृथ्विकने 'क्लास ऑफ ८३', 'डिस्पॅच' या हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :पृथ्वीक प्रतापमहाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेता