Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुरू तुरू चालू नको" गाण्यावर वनिता खरातचा भन्नाट डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 12:25 IST

साडी नेसून वनिताचा "तुरू तुरू" गाण्यावर डान्स, व्हिडिओ पाहून चाहते अवाक्

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे अनेक विनोदवीरांना त्यांची ओळख मिळाली. अभिनेत्री वनिता खरतही हास्यजत्रेमुळेच घराघरात पोहोचली. वनिताने अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर तिची स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. सुडौल आणि सुंदर दिसणारी ही अभिनेत्रीची चौकट मोडून वनिताने तिचं वेगळं स्थान सिनेसृष्टीत निर्माण केलं आहे. 

वनिताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकताच वनिताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ती डान्स करताना दिसत आहे. "तुरू तुरू चालू नको" या गाण्यावर बेभान होऊन नाचताना दिसत आहे. पिवळी साडी नेसून वनिताने हा डान्स केला आहे. प्रथमेश परब या कलाकाराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन वनिताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. प्रथमेश आणि वनिताचा हा भन्नाट डान्स पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 

या व्हिडिओत वनिताची एनर्जी आणि उत्साह पाहायला मिळत आहे. वनिताचे डान्स मुव्ह्स पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. वनिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

कोळीवाड्याची रेखा अशी ओळख मिळवलेल्या वनिताने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग' सिनेमात तिने मोलकरणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे वनिता प्रसिद्धीझोतात आली होती. 'एकदा येऊन तर बघा', 'सरला एक कोटी', 'विकी वेलिंगकर', 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह', 'सलमान सोसायटी' या सिनेमांत ती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार