Esha Dey:'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने अनेक नवोदित कलाकारांना ओळख मिळवून दिली. हास्यजत्रेती प्रत्येक कलाकाराने आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री ईशा डे.नुकताच ईशाने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. आपल्या विनोदी कौशल्यांना प्रेक्षकांना खळखळून हसवणारी ही नायिका लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
सध्या ईशा डेच्या घरी लग्नाची लगबग पाहायला मिळतेय. काल तिच्या घरी ग्रहमुख पूजन झाले, तर आज मेहंदी सोहळा पार पडला. अलिकडेच सोशल मीडियावर ईशाकडेच्या ग्रहमख विधीचे फोटो सोशल मीडियावर समोर आले होते. ईशाची मैत्रीण आणि कुटुंबियांनी अभिनेत्रीचे हे लग्नाआधीचे विधी केले. त्यानंतर आता अभिनेत्रीच्या हातावर होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेंहदी सजली आहे.या सोहळ्यात तिची ‘हास्यजत्रा’तील मैत्रीण वनिता खरातही उपस्थित होती. वनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ईशा डेच्या मेहंदी सोहळ्याचं फोटो शेअर करता माझ्या ईशाची मेहंदी असं सुंदर कॅप्शन दिलं आहे. तसेच ईशाच्या मेहंदी सोहळ्याला अभिनेत्री छाया कदम यांनी देखील हजेरी लावली आहे.
ईशाने आपल्या मेहंदी सोहळ्यासाठी अत्यंत साधा पण तितकाच सुंदर असा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. लग्नाचा हा आनंद या फोटोंमधून तिच्या चेहऱ्यावर झळकतो आहे. दरम्यान,ईशाने अद्यापही तिचा होणार नवरा कोण आहे. याबद्दल माहिती रिव्हिल केलेली नाही. त्यामुळे ती कधी लग्न करणार तसेच तिचे होणारे मिस्टर कोण आहेत... याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.
Web Summary : Esha Dey, famed for 'Maharashtrachi Hasyajatra,' is getting married soon! Her pre-wedding rituals, including the Mehendi ceremony, have begun. Details about the groom remain under wraps, exciting fans.
Web Summary : ‘महाराष्ट्र की हास्ययात्रा’ फेम ईशा डे जल्द ही शादी करने वाली हैं! मेहंदी समारोह सहित उनकी शादी से पहले की रस्में शुरू हो गई हैं। दूल्हे के बारे में विवरण अभी भी गुप्त हैं, जिससे प्रशंसक उत्साहित हैं।