Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं स्वप्न साकार, बायकोसह नवीन घरात गृहप्रवेश, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 09:44 IST

काहीच महिन्यांपूर्वी अभिनेत्याने मुंबईत त्याचं हक्काचं घर खरेदी केलं होतं. आता त्याने पत्नीसह घरात गृहप्रवेश केला आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. प्रत्येक घराघरात हा कार्यक्रम पाहिला जातो.  हास्यजत्रेने अनेक नवोदित कलाकारांना संधी देत उमदे विनोदवीर घडवले आहेत. अशाच हास्यवीरांपैकी एक म्हणजे रोहित माने. उत्तम अभिनय आणि विनोदबुद्धीच्या जोरावर रोहितने अल्पावधतीच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. अभिनेता होण्याबरोबरच रोहितचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं आहे. काहीच महिन्यांपूर्वी रोहितने मुंबईत त्याचं हक्काचं घर खरेदी केलं होतं. आता त्याने पत्नीसह घरात गृहप्रवेश केला आहे. 

रोहित सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींची माहिती तो पोस्टद्वारे चाहत्यांना देत असतो. रोहितने त्याच्या नवीन घरातील गृहप्रवेशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये रोहित त्याची पत्नी श्रद्धासह गृहप्रवेशाची पूजा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने "सुख कळले" असं म्हटलं आहे. त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

रोहितने जानेवारी महिन्यात मुंबईत घर घेतल्याचं सांगितलं होतं. घराच्या चावीचे फोटो शेअर करत त्याने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. याबरोबरच त्याने घराची झलक दाखवणारा छोटा व्हिडिओदेखील शेअर केला होता. रोहितने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या तो हास्यजत्रेतून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेतामहाराष्ट्राची हास्य जत्रा