Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची केदारनाथ यात्रा, शेअर केले सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:12 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेताही केदारनाथला पोहोचला आहे. याचे फोटो त्याने शेअर केले आहेत. 

उत्तराखंडमधील चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. दरवर्षी लाखो भाविक केदारनाथ आणि या चार धाम यात्रेला जातात. यंदाही अनेक भाविकांनी केदारनाथसाठी गर्दी केली आहे. अनेक सेलिब्रिटीही उत्तराखंडमधील केदारनाथ धामचं दर्शन घेत आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेताही केदारनाथला पोहोचला आहे. याचे फोटो त्याने शेअर केले आहेत. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेला आणि प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता प्रथमेश शिवलकरने केदारनाथ गाठलं आहे. प्रथमेश सोलो ट्रिप करत केदारनाथला पोहोचला आहे. अभिनेत्याने केदारनाथ मंदिरात जाऊन शिवलिंगचं दर्शन घेतलं. केदारनाथ धामचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. याला त्याने "ऊँ नम: शिवाय" असं कॅप्शन दिलं आहे. केदारनाथ हे प्रथमेशच्या बकेट लिस्टवर होतं. त्याच्या बकेट लिस्टमधील एक स्वप्न पूर्ण झालं आहे. 

प्रथमेशच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. वनिता खरातचा नवरा सुमित लोंढेने कमेंट करत "हर हर महादेव" असं म्हटलं आहे. तर शिवाली परबने "जय शंकर" अशी कमेंट केली आहे. अनेकांनी "ओम नम: शिवाय", "हर हर महादेव" अशा कमेंट या पोस्टवर केल्या आहेत. दरम्यान, प्रथमेश 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतो. काही सिनेमांमध्येही तो झळकला आहे. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारकेदारनाथ