Join us
Daily Top 2Weekly Top 5

रंगभूमीवर ओळख, ६ वर्ष डेटिंग अन् लग्न! 'अशी जमली निमिष-कोमलची जोडी, खूपच हटके आहे लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:41 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून निमिष कुलकर्णी घराघरात पोहोचला. अलिकडेच अभिनेता लग्नबंधनात अडकला.

Nimish Kulkarni Love Story: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहणारा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. या कार्यक्रमाने अनेक नवोदित कलाकारांना ओळख मिळवून दिली. या शोचे चाहते केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात आहेत. या कार्यक्रमातून निमिष कुलकर्णी हे नाव घराघरात पोहोचलं. नुकताच निमिष लग्नबंधनात अडकला आहे. त्याची पत्नी कोमल मराठी मनोरंजनसृष्टीत सक्रिय आहे. मालिकांची क्रिएटिव्ह हेड म्हणून ती काम पाहते. याचनिमित्ताने त्याने सपत्नीक राजश्री मराठीला मुलाखत दिली.  दरम्यान, कोमल आणि निमिषने त्यांच्या लव्हस्टोरी विषयी सांगितलं. 

'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत निमिषची पत्नी कोमलला त्यांची पहिली भेट कशी झाली? याबद्दल विचारलं गेलं. तेव्हा ती म्हणाली, "२०१९ मध्ये एका एकांकिकेमध्ये मी त्याला काम करताना पाहिलं होतं. त्यामध्ये याचा एकदम छोटासा रोल होता. हा तिकडे यायचा परफॉर्म करायचा आणि निघून जायचा. त्या एकांकिकेतील याचं काम मला खूप आवडलं होतं. आमची एक पूजा मिठबावकर नावाची कॉमन मैत्रीण आहे. तिला मी फक्त असं म्हटलं होतं अगं तो अमुक एक मुलगा मला छान वाटला. खूप छान काम करतो. तर तिने मस्करीत याला ते सगळं सांगितलं. अरे, माझी एक मैत्रीण आहे तिला तू आवडलास म्हणून असं तिने याला सांगितलं. त्याचवेळी मी एका नाटकाचं मॅनेजमेन्ट करत होते. तर ते नाटक बघायला हा तिकडे येणार होता. ते तिकिट माझ्याकडे होतं. मग मी याला तिकिट वगैरे दिलं. तिकडे आमची पहिली भेट झाली. त्याच्यानंतर मग हळूहळू आम्ही बोलायला लागलो."

पुढे ती म्हणाली,"मला आठवतंय २५ ऑक्टोबर २०१९ ला पहिल्यांदा आम्ही भेटलो. त्याच्या दुसऱ्या दिवशी निमिषचा वाढदिवस होता. तेव्हा त्याच्या वाढदिवसाची खरेदी करायची म्हणून आम्ही अख्खं मार्केट फिरत होतो. तेव्हा आम्हाला असं जाणवलं की आमची वाईब्स मॅच होत आहेत. त्यानंतर मग आम्ही डेटिंग करायला सुरुवात केली."

निमिष काय म्हणाला...

या मुलाखतीत निमिष म्हणाला, "आमच्या डेटिंगला ६ वर्ष होतील. आम्हा दोघांनाही गाणी ऐकायला आवडतात. त्यामुळे आमच्या वाईब्स मॅच झाल्या.  हळूहळू बऱ्याच गोष्टी मॅच झाल्या. मी खूप बोलतो आणि ती फक्त ऐकून घ्यायची. सुरुवातीला ती खूप इन्ट्रोव्हर्ट होती. त्याच्यानंतर २०२० मध्ये लगेच लॉकडाऊन लागला आणि लॉंग डिस्टंस सुरु झालं. याचं पुढे काय होईल माहित नव्हतं. पण, तिने खूप पुढाकार घेतला. त्यानंतर एक वर्षानंतर तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात या मुलीने मोठं पाऊल उचलंल ती आमच्या एका मैत्रीणीकडे मालाडला शिफ्ट झाली. तिने स्टारच्या  एका मालिकेला टीसीआर रेडी म्हणून जॉईन केलं. त्याच्यानंतर तिचा प्रवासाचा चढता ग्राफ होता. तिच्या या गोष्टी मला जास्त इम्प्रेस करत होत्या. मी कुठेतरी कधी कमी पडलो असेल पण मी तिला कधी निराश झालेलं पाहिलं नाही. तिने जेवढी मेहनत केली, गट्स दाखवले तेवढी हिंमत माझ्यात नव्हती. ती मला २४ व्या वर्षी भेटली. शिवाय तिच्यामुळेच मी कुठेतरी आयुष्यात गट्स दाखवू शकलो. त्याच्यामुळे आम्ही आजवर एकत्र आहोत." 

टॅग्स :टेलिव्हिजनमहाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेता