Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महाभारत'फेम अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक; गूफी पेंटल रुग्णालयात देतायेत मृत्युशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 08:28 IST

Gufi paintal : गेल्या काही महिन्यांपासून गूफी पेंटल आजारी आहेत. यामध्येच बुधवारी रात्री अचानकपणे त्यांची प्रकृती खालावली.

छोट्या पडद्यावर रामायण आणि महाभारत या मालिकांनी कलाविश्वाचा एक काळ गाजवला आहे. या मालिकांमधील अनेक कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेले. तर, काही कलाकार कलाविश्वापासून दूर झाले आहेत. यामध्येच 'महाभारत' या मालिकेतील शकुनी मामा अर्थात अभिनेता गूफी पेंटल (gufi paintal ) यांच्याविषयी एक मोठी माहिती समोर येत आहे. गूफी पेंटल यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या ते रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री टीना घई यांनी गूफी पेंटल यांच्या आरोग्याविषयीची माहिती दिली आहे. तेव्हापासून चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. टीना यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, गूफी पेंटल यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच गूफी पेंटल यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतेही अपडेट देण्यास सध्या मनाई केल्याचं त्यांनी मिडियाशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून गूफी पेंटल आजारी आहेत. यामध्येच बुधवारी रात्री अचानकपणे त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्याच आलं. गूफी यांनी बी. आर. चोप्रा यांच्या महाभारतमध्ये शकुनी मामाची भूमिका साकारली होती. तसंच त्यांनी श्री चैतन्य महाप्रभू नावाचा एक सिनेमाही दिग्दर्शित केला होता.

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनमहाभारत