Join us

'आई कुठे...' फेम अभिनेत्रीने केलं मतदान, म्हणते- "आशा आहे की हे मत तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 13:37 IST

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीही मतदानाची जबाबदारी पार पाडली आहे. मतदान केल्यानंतर निळी शाई लावलेल्या बोटाचा फोटो अभिनेत्रीने शेअर केला आहे.

सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आज राज्यात लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावत त्याचं महत्त्व पटवून दिलं आहे. 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीही मतदानाची जबाबदारी पार पाडली आहे. 

'आई कुठे काय करते' ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत आरोहीची भूमिका साकारून अभिनेत्री कौमुदी वलोकर घराघरात पोहोचली. कौमुदीने मतदानाचा हक्क बजावला आहे. तिने मतदान करत चाहत्यांना याचं महत्त्व पटवून दिलं आहे.  कौमुदीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मतदान केल्यानंतर शाई लावलेल्या बोटाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने "आशा आहे की हे मत मोजलं जाईल. तुमचं कर्तव्य बजावा", असं कॅप्शन दिलं आहे. 

कौमुदीने अनेक मालिका आणि मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. शाळा, मी वसंतराव, व्हाय झेड, शटर या सिनेमांमध्ये ती झळकली होती. तुझ्या माझ्यात या मालिकेतही तिने काम केलं आहे. पण, 'आई कुठे काय करते' मालिकेमुळे कौमुदीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकारलोकसभा निवडणूक २०२४