Join us

व्वा रे पठ्ठ्या! कुशल बद्रिके झळकणार हिंदी रिॲलिटी शोमध्ये; प्रोमो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 15:22 IST

Kushal badrike: या टिव्ही शोमध्ये कुशलसोबत अभिनेत्री हुमा कुरेशीसुद्धा दिसून येणार आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, विनोदवीर म्हणजे कुशल बद्रिके (kushal badrike). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर कुशलने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. मात्र, आता त्याने थेट हिंदी मालिकाविश्वात एन्ट्री घेतली आहे.

मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर कुशल आता हिंदी कलाविश्वात गाजवण्यास सज्ज झाला आहे. कुशल लवकरच सोनी टीव्हीवर झळकणार आहे. सोनी टीव्हीवरील   "मॅडनस मचाऐंगे" या कॉमेडी शोमध्ये दिसणार आहे. सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये कुशलची झलक दिसून येत आहे.

दरम्यान, या न्या हिंदी मालिकेत कुशल काय कमाल करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सोबतत या टीव्बी शोमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीदेखील असल्याचं या प्रोमोमध्ये दिसून येत आहे.

 

टॅग्स :कुशल बद्रिकेटेलिव्हिजनटिव्ही कलाकारहुमा कुरेशी