Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुर्यात सदा मंगलम्! 'कोण होतीस तू...' फेम रेवती लेलेचं पुण्यात थाटात पार पडलं लग्न, अभिनेत्रीचा नवरा आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 08:32 IST

साता जन्माचे सोबती! थाटात पार पडला अभिनेत्री रेवती लेलेचा विवाहसोहळा, अखेर नवऱ्याचा चेहरा आला समोर

Revati Lele Wedding: मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या अनेक कलाकारांची लगीन सराई सुरू झालीये. यावर्षात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. अशातच आता एका लोकप्रिय अभिनेत्रीने नवीन वर्षातच आयुष्याची नवीन सुरुवात केलीये.ही अभिनेत्री म्हणजे रेवती लेले. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री रेवती लेलेल्या लग्नाच्या चर्चा जोरदार होत्या. अखेरीस रेवतीने लग्नबंधनात अडकली असून तिने तिच्या लग्नाचे फोट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

अभिनेत्री रेवती लेले आणि कौशिक भिडे यांचं काल पुण्यात लग्न पार पडलं. काही दिवसांपूर्वीच रेवती लेलेने सोशल मीडियावर होणाऱ्या जोडीदारासोबत फोटो शेअर करत तिच्या नात्याची कबुली दिली होती. मात्र, होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा रिव्हिल केला नव्हता. त्यामुळे रेवती कोणासोबत लग्न करणार याची अनेकांना उत्सुकता होती.अखेर आज रेवतीने कौशिक भिडे या डिझायनरसोबत लग्नगाठ बांधली."Hey You...", असं कॅप्शन देत कौशिकने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सध्या कलाविश्वातून या नवोदित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

अभिनेत्री रेवती लेलेने कौशिक भिडेसोबत  मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न केलं आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि पती कौशिक अगदी पारंपरिक मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहेत. अभिनेत्रीने लग्नासाठी पिवळ्या रंगाची नऊवारी साडी, हातात हिरवा चुडा, डोक्याला मुंडावळ्या आणि पिवळ्या नऊवारीवर शोभेल असा लाल रंगाचा शेला असा लूक केला आहे. तर कौशिकने ऑफ लाल रंगाची शेरवानी परिधान केलीये.

वर्कफ्रंट

रेवती लेलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने  'लग्नाची बेडी' या मालिकेतून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेली मधुराणी  नावाची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली. याशिवाय अलिकडेच 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेत पाहायला मिळाली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Revati Lele of 'Kon Hotis Tu' fame, ties knot in Pune.

Web Summary : Actress Revati Lele, known for 'Kon Hotis Tu', married designer Kaushik Bhide in Pune. The wedding photos are circulating, with blessings pouring in for the Marathi couple. She previously starred in 'Lagnachi Bedi'.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडियाव्हायरल फोटोज्