Join us

‘ठिपक्याची रांगोळी’ या मालिकेतील कुक्कीच्या पत्नीला पाहिलं का? दिसते खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 08:00 IST

Thipkyanchi Rangoli : ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील कुक्की अर्थात ही भूमिका साकारणारा अभिनेता अतुल तोडणकर याची पत्नी देखील अभिनेत्री आहे.

 छोट्या पडद्यावरची ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) ही कानिटकर कुटुंबाची कथा सांगणारी  मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली.  शरद पोंक्षे, अतुल तोडणकर,लीना भागवत अशी तगडी स्टारकास्ट आणि रोज नवे ट्विस्ट यामुळे ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.    मालिकेतील सगळ्याच भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत. या मालिकेतील कुक्की अर्थात ही भूमिका साकारणारा अभिनेता अतुल तोडणकर (Atul Todankkar) आपल्या सहज आणि गमतीशीर अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

अतुल तोडणकर हा विनोदी कलाकार म्हणून सर्वांना परिचित आहे. अनेक मराठी चित्रपट, मालिका व नाटकांमध्ये त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. पण आज आम्ही अतुलबद्दल नाही तर त्याच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत. होय, अतुलची पत्नी ही सुद्धा अभिनेत्री आहे. ती कमालीची सुंदर आहे.

 

अतुल याच्या पत्नीचे नाव आहे. माधुरी काळे या देखील अभिनेत्री आहेत. एका वेब सीरिज मध्ये तिने काम केले असून काही प्रॉडक्शन ब्रँडसाठी मॉडेल म्हणून देखील काम केले आहे.   माधुरी आणि अतुल यांची आधीपासूनच ओळख होती.

मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं  आणि त्यानंतर दोघांनी लग्न केलं. माधुरी आणि अतुल यांना शौर्य नावाचा मुलगा  आहे.  मुलासोबतचे फोटो देखील ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. माधुरी व अतुल हे सोशल मीडियावर देखील खूप  सक्रिय आहेत. दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. त्यांच्या सोशल मीडियावरचे फोटो पाहून तुम्हालाही या पे्रमाची खात्री पटेल.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार