Join us

'तारक मेहता..'चा 'हा' अभिनेता खऱ्या आयुष्यात आहे इंजिनिअर; अभिनयासाठी सोडली विदेशातील नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 16:42 IST

Taarak mehta ka ooltah chashmah: दयाबेन, जेठालाल, तारक मेहता, सेक्रेटरी भिडे, बबिता या भूमिका वठवणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

गेल्या १४-१५ वर्षांपासून अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah). २००८ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या मालिकेची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. दयाबेन, जेठालाल, तारक मेहता, सेक्रेटरी भिडे, बबिता या भूमिका वठवणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात. विशेष म्हणजे या मालिकेतील एका कलाकाराने चक्क विदेशातील नोकरी सोडून अभिनयाची वाट धरली आहे.

'तारक मेहता'मधील दयाबेन आणि जेठालाल यांच्याप्रमाणेच गाजलेली एक भूमिका म्हणजे सेक्रेटरी भिडे. 'मी आत्माराम तुकाराम भिडे. गोकुलधाम सोसायटी का एकमेव सेक्रेटरी' या डायलॉगमुळे भिडे मास्तर घराघरात लोकप्रिय झाला. ही भूमिका अभिनेता मंदार चांदवाडकर (Mandar Chandwadkar) यांनी साकारली आहे. विशेष म्हणजे अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मंदार एका नामांकित कंपनीमध्ये कामाला होते. इतकंच नाही तर अभिनयाच्या प्रेमापोटी त्यांनी विदेशातील नोकरीही सोडली.

मंदार चांदवाडकर यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असून ते दुबईमधील एका नामांकित कंपनीत काम करत होते. मात्र, २००० साली त्यांनी या नोकरीचा राजीनामा देत थेट मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर त्यांनी थिएटर जॉइन केलं आणि अनेक नाटकांमध्ये काम केलं. याच काळात २००८ साली त्यांना तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेची ऑफर मिळाली. तेव्हापासून ते या मालिकेचा भाग आहे.

दरम्यान, तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील अनेक कलाकारांनी त्यांची नोकरी सोडून अभिनयाची वाट धरल्याचं सांगण्यात येतं. यात एका मुलाखतीत जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनीदेखील या मालिकेमुळे आपलं नशीब पार पालटून गेल्याचं म्हटलं होतं.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मासेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन