बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांच्या दिवसाची सुरुवात धमाकेदार गाण्याने होते. घरातील सगळे सदस्य गाण्यावर एकत्र येऊन डान्स करतात. बिग बॉसच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याला काही ना काही सवयी असतात. कोणी चहा बनवत, तर कोणाची जबाबदारी नसताना देखील घराला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत. अशीच एका सदस्याची सवय आता संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे आणि तो सदस्य म्हणजे किशोरी शहाणे. दररोज सकाळी किशोरी शहाणे अगदी त्याच उत्साहात सगळ्या सदस्यांसोबत मॉर्निंग डान्स करतात आणि एक गोष्ट त्या न चुकता करतात आणि ती म्हणजे रोज त्या कॅमेराजवळ येऊन “शुभ सकाळ बिग बॉस” असे म्हणतात. यावरून मागील पर्वातील कोणत्या सदस्याची आठवण येते का हो तुम्हाला ? अगदी बरोबर मागील पर्वाची विजेती सदस्य मेघा धाडे देखील न चुकता बिग बॉसना “गुड मॉर्निंग बिग बॉस” असे म्हणायची आणि ते देखील बरच गाजलं होत.
बिग बॉस मराठी सिझन २ : किशोरी शहाणे करतात का मेघा धाडेला फॉलो ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 16:49 IST
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांच्या दिवसाची सुरुवात धमाकेदार गाण्याने होते. घरातील सगळे सदस्य गाण्यावर एकत्र येऊन डान्स करतात.
बिग बॉस मराठी सिझन २ : किशोरी शहाणे करतात का मेघा धाडेला फॉलो ?
ठळक मुद्देमागील पर्वाची विजेती सदस्य मेघा धाडे देखील न चुकता