Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मोठ्या व्यक्तींचा सन्मान...", किरण मानेंची पोस्ट चर्चेत; राहुल गांधींची शाहरुखशी केली तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 09:26 IST

शाहरुखबरोबर किरण मानेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही व्हिडिओ शेअर करत तुलना केली आहे.

किरण माने हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात माने सहभागी झाले होते. 'बिग बॉस'मुळे त्यांना खऱ्य अर्थाने लोकप्रियता मिळाली. किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींबद्दल ते पोस्टमधून व्यक्त होताना दिसतात. किरण मानेंच्या पोस्ट हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. 

आता किरण मानेंनी वर्ल्डकप फायनलदरम्यानचा शाहरुख खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. वर्ल्डकप फायनलदरम्यान शाहरुख आशा भोसलेंचा कप उचलताना दिसला होता. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. शाहरुखच्या या कृतीमुळे त्याचं सर्वच स्तरातून कौतुक झालं होतं. शाहरुखबरोबर किरण मानेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही व्हिडिओ शेअर करत तुलना केली आहे. या व्हिडिओत राहुल गांधी सध्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाणी देताना दिसत आहेत. पाणी पिऊन झाल्यानंतर खर्गेंचा ग्लासही राहुल गांधी ठेवताना दिसत आहेत. एका कार्यक्रमादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. 

राहुल गांधी आणि शाहरुखचा हा व्हिडिओ शेअर करत किरण मानेंनी पोस्ट लिहिली आहे. "जे आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा सन्मान करतात, तेच या जगात यशस्वी होत नाव कमावतात", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टला त्यांनी संस्कार, राहुल गांधी आणि SRK असे हॅशटॅग दिले आहेत. 

दरम्यान, किरण माने सध्या 'सिंधुताई माझी माय' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'रावरंभा' या ऐतिहासिक चित्रपटात ते झळकले होते. लवकरच ते महेश मांजरेकरांच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :राहुल गांधीकिरण मानेशाहरुख खानटिव्ही कलाकार