Join us

हिवाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी खुशबू तावडे वापरते 'ही' ट्रीक; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 18:43 IST

Khushbu Tawade: खुशबू तिच्या लूकसाठी संग्रामच्या म्हणजेच तिच्या नवऱ्याच्या कपड्यांचाही वापर करते.

संक्रांतीनंतर सगळीकडेच थंडीने जोर पकडला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाच्या वॉर्डरोबमधील स्वेटर आणि गरम उबदार कपडे हळूहळू करत बाहेर येऊ लागले आहेत. मात्र, याच काळात सेलिब्रिटी त्यांच्या हटके फॅशन कॅरी करताना दिसतात. त्यामुळेच मराठी कलाविश्वातील अभिनेत्री हिवाळ्यात त्यांची हटके फॅशन कशाप्रकारे कॅरी करतात त्यावर प्रकाश टाकूयात.

तितिक्षा तावडेपासून खुशबू तावडेपर्यंत काही लोकप्रिय अभिनेत्रींनी हिवाळ्यात त्यांना कोणता लूक करायला आवडतो हे सांगितलं आहे. यामध्येच 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेतील उमा म्हणजेच अभिनेत्री खुशबू तावडे हिने हिवाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी एक खास ट्रिक वापरत असल्याचं सांगितलं.

"हिवाळा आला की माझ्या नवऱ्याच्या म्हणजेच संग्रामच्या वॉर्डरोबमधून जॅकेट्स वापरायला सुरवात करते. मला वेगवेगळ्या प्रकाराच्या शाल इतर कपड्यांसोबत मॅच करुन त्या वापरायला आवडतात. मुंबईत तितकीशी थंडी नसते पण विंटर ओव्हरकोट ही छान वाटतात. इन्फिनिटी स्कार्फ आणि  ब्लँकेट स्कार्फ हे सुद्धा छान दिसतात, असं म्हणत खुशबू तावडेने तिची ट्रिक सांगितली.

दरम्यान, ''मला हिवाळ्यात लोकरने बनवलेले कॉर्ड- सेट्स घालायला खूप आवडतात. हलक्या रंगाचे स्वेटशर्ट, ओव्हर साइझ टीशर्ट आणि त्यासोबत बॅगी जीन्स हे माझे आवडते कपडे असतात'', असं तितिक्षा म्हणाली. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारतितिक्षा तावडे