Join us

'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 16:27 IST

कोण आहे ही अभिनेत्री?

एकता कपूरची 'कसोटी जिंदगी की' मालिका सर्वात गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. श्वेता तिवारी, सैझान खान आणि रोनित रॉय यांना मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. तर उर्वशी ढोलकियाला कोमोलिका या खलनायिकेच्या भूमिकेतून प्रसिद्धी मिळाली. काही वर्षांपूर्वी मालिकेचा दुसरा भागही आला होता. यातील एका अभिनेत्रीने नुकताच पतीपासून घटस्फोट घेतला आहे. कोण आहे ती?

'कसौटी जिंदगी की २' मध्ये काम केलेली अभिनेत्री सोन्या अयोध्या (Sonya Ayodhya) आणि पती हर्ष समोरो यांचा घटस्फोट फायनल झाला आहे. दोघांचा ५ वर्षांचा संसार मोडला आहे. टाइम्स ऑफ इंडिया रिपोर्टनुसार, गेल्या महिन्यातच त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. त्याआधी दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं तेव्हापासूनच त्यांच्यात बिनसल्याची चर्चा झाली होती. यानंतर त्यांनी एकत्रित असलेले फोटोही डिलिट केले होते. आता त्यांचा घटस्फोट जगजाहीर झाला आहे.

सोन्या आणि हर्ष २०१९ साली लग्नबंधनात अडकले. जयपूरमध्ये त्यांचा ग्रँड विवाह सोहळा पार पडला होता. मात्र गेल्या वर्षीच ऑक्टोबर महिन्यात त्यांच्यात दुरावा आला. सोन्याने अद्याप यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही. सध्या ती करिअरवर लक्ष देत आहे. सोन्या 'शक्ति अस्तित्व के एहसास की','नजर' सारख्या मालिकांमध्ये दिसली आहे. सोशस मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंची कायम चर्चा असते.

टॅग्स :टिव्ही कलाकारघटस्फोटकसौटी जिंदगी की 2