Join us

कार्तिक आर्यनने नेहा कक्कड आणि आदित्य नारायणच्या लग्नाविषयी दिली ही माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 07:00 IST

इंडियन आयडल या कार्यक्रमात कार्तिकने ही माहिती दिली.

ठळक मुद्देकार्तिक या कार्यक्रमात नेहा आणि आदित्यला चिडवत म्हणाला की, मला दोन्ही पक्षांकडून आमंत्रण असेलच. कारण आदित्य आणि नेहा या दोघांशी माझी खूप चांगली मैत्री आहे. त्यावर नेहा लगेच म्हणाली की, कार्तिकने वधू पक्षाकडूनच असायला हवे.

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

इंडियन आयडलच्या आगामी भागात कार्तिक आर्यन आणि सारा अली खान हजेरी लावणार आहेत. ते या कार्यक्रमात लव्ह आज कल 2 या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत. ते या कार्यक्रमातील स्पर्धकांसोबत प्रचंड धमाल मस्ती करणार आहेत.

इंडियन आयडल या कार्यक्रमाचे फॅन्स 14 फेब्रुवारीची खूप आतुरतेने वाट बघत आहेत. कारण त्या दिवशी या कार्यक्रमातील प्रेक्षकांची एक आवडती जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे.

इंडियन आयडल 11 मधली अंकोना मुखर्जीने ‘तेरे लिए हम है जिये’ गीतावर हृदयस्पर्शी परफॉर्मन्स सादर केला. तिच्या या परफॉर्मन्सनंतर कार्तिक आर्यनने नेहा आणि आदित्यचे अभिनंदन केले. त्यांचा विवाह या व्हॅलेंटाईनच्या दिवशी होणार असल्याचे म्हटले जात आहे. तो त्यांना चिडवत म्हणाला की, मला दोन्ही पक्षांकडून आमंत्रण असेलच. कारण आदित्य आणि नेहा या दोघांशी माझी खूप चांगली मैत्री आहे. त्यावर नेहा लगेच म्हणाली की, कार्तिकने वधू पक्षाकडूनच असायला हवे. कारण तो तिचा भाऊ टोनी कक्कडचा चांगला मित्र आहे. नेहा खेळकरपणे म्हणाली की, वधूपक्षाकडून हजर असणे हे कार्तिकचे कर्तव्य आहे. त्यावर कार्तिकने उत्तर दिले की, तो लग्नात दोघांच्या बाजूने हजेरी लावेल. 

या कार्यक्रमात पुढे अंकोनाने सांगितले  की, कार्तिक आर्यन तिचा पहिला क्रश होता आणि तिला त्याच्या बरोबर डान्स करण्याची इच्छा आहे. कार्तिकने देखील अंकोनाची ही इच्छा पूर्ण केली आणि तिच्याबरोबर लव्ह आज कल 2 या आपल्या आगामी चित्रपटातील ‘शायद’ गीतावर नृत्य सादर केले.

टॅग्स :कार्तिक आर्यननेहा कक्करआदित्य नारायणइंडियन आयडॉल