Join us

कष्टाचं चीज झालं! मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी, लोकप्रिय मालिकेत करतेय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:25 IST

कष्टाचं फळ मिळालं! 'कमळी' फेम अभिनेत्रीने खरेदी केली नवी गाडी, होतोय कौतुकाचा वर्षाव

Marathi Actress Buy New Car: अलिकडेच झी मराठी वाहिनीवर 'कमळी' ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतील कमळी, अनिका आणि ऋषी, आबा ही पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. दरम्यान, कमळी मध्ये अभिनेत्री विजया बाबर मुख्य भूमिकेत दिसत आहे. तर अभिनेता निखिल दामलेने ऋषी नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. याशिवाय अभिनेत्री केतकी कुलकर्णी अनिका नावाची भूमिका वठवते आहे. श्रीमंत घरची आणि गर्विष्ठ असलेली अनिकाने आपल्या अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय, सध्या ही अभिनेत्री चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर केतकीने खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे. 

'कृष्णा मोहिनी' या हिंदी मालिकेतून अभिनेत्री केतकी कुलकर्णीने छोटा पडदा गाजवला. या मालिकेत तिने साकारलेल्या मोहनच्या भूमिकेने सर्वांची मनं जिंकली. सध्या ती कमळी मालिकेत पाहायला मिळतेय. अशातच नुकतंच केतकी कुलकर्णीनच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना नव्या गाडीची झलक दाखवली आहे.  

केतकी कुलकर्णीनी तिच्या इन्स्टाग्रामवर अकांउंटवर नवी गाडी खरेदी करताना व्हिडीओ पोस्ट केला आहे. अभिनेत्रीने 'Maruti Suzuki XL6' ब्रॅंडची नवी गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत जवळपास ११ लाखांच्या घरात आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीवर तिच्या चाहत्यांस मराठी सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. "२० व्या वाढदिवसापूर्वीचं मी स्वत: लाच दिलेलं गिफ्ट...", असं कॅप्शन या व्हिडीओला देत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

वर्कफ्रंट

केतकीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने 'कृष्णा मोहिनी' ,'बातें कुछ अन कहीं सी' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच ‘1920: हॉरर्स ऑफ द हार्ट' या सीरीजमध्येही ती झळकली आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया