Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हातात हत्यारं असलेल्या गुंडांनी...", जुईने सांगितला भयावह प्रसंग; आई म्हणाली- "बिनधास्त गाडी अंगावर घाल!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 15:01 IST

जुईने एका अभिनेत्रीबरोबर रात्री गाडी चालवताना घडलेला प्रसंग सांगितला. तर अभिनेत्रीच्या आईने तिला रात्री कोणीही समोर आलं तरी गाडी अंगावर घालण्याचा सल्ला दिल्याचंही सांगितलं.

जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. 'पुढचं पाऊल' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. सध्या जुई 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. जुईने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. जुई आणि तिच्या कुटुंबीयांनी लोकमत फिल्मीशी गप्पा मारल्या. यावेळी जुईने एका अभिनेत्रीबरोबर रात्री गाडी चालवताना घडलेला प्रसंग सांगितला. तर अभिनेत्रीच्या आईने तिला रात्री कोणीही समोर आलं तरी गाडी अंगावर घालण्याचा सल्ला दिल्याचंही सांगितलं.

जुईची आई म्हणाली, "एका सेलिब्रिटीची गाडी मढला रात्री अडवली होती. तो किस्सा जुईने सांगितला होता. तेव्हा मी तिला म्हटलं होतं की कोणीही रात्री समोर आलं तर गाडी थांबवायची नाही. वेळ आली तर तू बिनधास्त गाडी अंगावर घाल. पुढचं आपण बघू. पण, आपण गाडी थांबवायची नाही". त्यानंतर जुईने पूर्वा गोखलेसोबत घडलेला प्रसंग सांगितला. 

"पूर्वी मढला खूप किस्से व्हायचे. पूर्वा गोखलेबरोबर एक प्रसंग घडला होता. मडमध्ये काही गुंडांनी येऊन तिची गाडी अडवली होती. त्यांच्या हातात हत्यारे होती. तिने कसाबसा पळ काढला आणि गाडी रिव्हर्स घेऊन ती एका सेटवर गेली होती. १० वर्षांपूर्वी तेव्हा खूप जास्त रिस्क होती. पण, आता तसं राहिलेलं नाही. आता रहदारी वाढली आहे", असं जुई म्हणाली. 

टॅग्स :जुई गडकरीटिव्ही कलाकार