Join us
Daily Top 2Weekly Top 5

केवळ 3 वर्षात पत्नीपासून वेगळा झाला अभिनेता रवी भाटिया, म्हणाला- प्रेग्रेंन्सीमुळे घाईत करावं लागलं होतं लग्न...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 13:35 IST

अभिनेता रवी भाटियाचे तीन वर्षांचे लग्न मोडले आहे.

टीव्ही सीरियल जोधा अकबर मध्ये सलीमची भूमिका साकारणार्‍या अभिनेता रवी भाटियाचे तीन वर्षांचे लग्न मोडले आहे. त्याने आपली इंडोनेशियन पत्नी युलिदा हंडयानीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार रवीने दिलेल्या एका मुलाखती सांगितले की, युलिदासोबत 2016 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घाईने घेतला होता. तो म्हणाला, 'मी आणि युलिदा खूप कमी वेळासाठी एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये होतो आणि त्यादरम्यान ती प्रेग्नेंट झाली. आम्ही लग्न केले. आम्ही लग्न केले तेव्हा ती 3 महिन्यांची प्रेग्नेंट होती. लग्न करण्याचा निर्णय हा खूप मोठा निर्णय आहे आणि तो फार विचारपूर्वक घेतला पाहिजे.

इंडोनेशियात अभिनयाच्या दरम्यान भेटली होती युलिदा'इश्क शुभान अल्लाह' आणि 'जोधा अकबर' यासारख्या टीव्ही कार्यक्रमात झळकलेला रवी भाटियाने आपण युलिदा हंड्यानीला कसे भेटले हे स्पष्ट केले. रवीने सांगितले ,की काही वर्षांपूर्वी इंडोनेशियात युलिदाची भेट झाली होती, जेव्हा तो तिथे अभिनय करत होता.

या कारणामुळे तुटले रवी भाटियाचे लग्न तो म्हणाले, 'युलिदा खूप चांगली आहे, परंतु आमच्या ब्रेकअपसाठी सांस्कृतिक मतभेद जबाबदार होते. भाषेच्या समस्येमुळे ती मुंबईत स्थायिक होऊ शकली नाही. तिला मैत्री करता आली नाही आणि बर्‍याच अंशी ती माझी चूक होती. मी माझं करिअर बनवण्यात इतका व्यस्त होतो की मला त्यांना जास्त वेळ देता आला नाही. तिला खूप एकटे वाटले आणि कुटुंबाची खूप आठवण झाली. म आणि आनंदाने आपले जीवन व्यतीत केले. तेव्हा आम्ही दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

मुलाची कस्टडी पत्नीकडे रवी आणि युलिदा यांना एक मुलगा देखील आहे, ज्याची कस्टडी युलिदाकडे आहे. रवी म्हणाला, ''मला मुलाची खूप आठवण येते. पण मला माहित आहे की ती तिची चांगली काळजी घेईल. तो तिच्याबरोबर राहिल हे जास्त चांगलं आहे.  पण त्याच्याविषयी माझ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्या मी पूर्ण करेन.''

टॅग्स :टिव्ही कलाकारघटस्फोट