Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये निर्मिती सावंत यांचे हास्याचे चौकार, व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 16:44 IST

विनोदाची महाराणी निर्मिती सावंत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सहभागी होणार आहेत. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम अगदी आवडीने पाहिला जातो. यातील कलाकार विनोदाचं अचूक टायमिंग साधत हास्याचे फव्वारे उडवत प्रेक्षकांच्या टेन्शनची मात्रा दूर करतात. हास्यजत्रेचे आणि त्यातील कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात ओंकार भोजने दिसला होता. एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ओंकार हास्यजत्रेत आला होता. आता विनोदाची महाराणी निर्मिती सावंत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सहभागी होणार आहेत. 

निर्मिती सावंत यांचा हास्यजत्रेतील प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत त्या स्किटमध्ये त्यांच्या अभिनय शैलीने हास्याचे चौकार मारताना दिसत आहेत. समीर चौघुलेंनी हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनाही हसू अनावर झालं आहे. हास्यजत्रेत निर्मिती सावंत यांना पाहण्याासाठी चाहतेही आतुर आहेत. निर्मिती सावंत यांनी त्यांच्या अभिनय शैलीने सिनेसृष्टीत नाव कमावलं. 'गंगूबाई नॉन मेट्रिक' ही त्यांची मालिका प्रचंड गाजली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत विनोदी भूमिकांबरोबरच अनेक विविधांगी पात्रही साकारली. 

दरम्यान, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये निर्मिती सावंत त्यांच्या आगामी 'झिम्मा २' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. २४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून 'झिम्मा' या मराठी सिनेमाचा हा सीक्वेल आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत यांच्याबरोबर सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, सुहास जोशी, रिंकू राजगुरू, क्षिती जोग, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहेत. हेमंत ढोमेने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेतामराठी चित्रपटसिद्धार्थ चांदेकर