Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता'मधून जेठालाल गायब; दिलीप जोशींनी घेतला ब्रेक, कारण काय?, पाहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 18:13 IST

Dilip Joshi: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 14 वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: लोकप्रिय सिटकॉन 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 14 वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. पण, गेल्या अनेक दिवसांपासून या मालिकेत वादाची ठिणगी पडली आहे. आधी अनेकांनी शो सोडून दिला, त्यानंतर निर्माते असित मोदी यांच्यावर आरोप केले. दरम्यान, आथा आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

या मालिकेतील प्रमुख भूमिका असलेल्या जेठालालचा सर्वात मोठा चाहतावर्ग आहे. ही भूमिका प्रसिद्ध अभिनेते दिलीप जोशी साकारतात. पण, पुढील काही दिवस मालिकेत जेठालाल दिसणार नाही. दिलीप जोशी यांनी मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी ही माहिती दिली.

दिलीप जोशी आपल्या कुटुंबासह टांझानियाला धार्मिक प्रवासासाठी जात आहेत, त्यामुळे त्यांनी शोमधून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे दिलीप जोशी यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता चाहत्यांना पुढील काही दिवस मालिकेत जेठालाल दिसणार नाही. जेठालाल दिसणार नसल्यामुळे चाहत्यांची घोर निराशा झाली आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनबॉलिवूड