Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जीव माझा गुंतला'फेम हा अभिनेता अडकला लग्नबंधात; पत्नीसोबतचा उ अंटा वा.. चा व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 10:41 IST

Ronak shinde: २ फेब्रुवारी रोजी या दोघांनी लग्न केलं असून त्यांनी लग्नात उ अंटा वा.. या गाण्यावर केलेला डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. यात बॉलिवूडपासून ते मराठी कलाविश्वात अनेक सेलिब्रिटींनी नव्या वर्षातच लग्नगाठ बांधत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. यामध्येच आता जीव माझा गुंतला या मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्याने लग्न केलं आहे. सध्या त्याच्या लग्नाचे काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

छोट्या पडद्यावर सध्या 'जीव माझा गुंतला' ही मालिका चांगली लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. त्यातच या मालिकेतील अभिनेत्याने लग्न केल्यामुळे त्याची चर्चा रंगली आहे.

'जीव माझा गुंतला' या मालिकेतील रौनक शिंदे (ronak shinde) याचं नुकतंच लग्न झालं आहे. रौनकने प्राची मोरे हिच्यासोबत लग्न केलं आहे. रौनक जीव माझा गुंतलामध्ये मेघची भूमिका साकारत आहे. तर, प्राची खऱ्या आयुष्यात एक फोटोग्राफर आहे.  २ फेब्रुवारी रोजी या दोघांनी लग्न केलं असून त्यांनी लग्नात उ अंटा वा.. या गाण्यावर केलेला डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, रौनक शिंदे अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शकदेखील आहे. 'जीव माझा गुंतला' या मालिका व्यतिरिक्त त्याने 'स्वराज्यजननी जिजामाता', 'फ्रेशर्स' या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच 'भास आभास', 'स्वर्गीय छोटाला', 'ऑल द बेस्ट २', 'दिनूच्या सासूबाई राधाबाई', 'प्लॅंचेट' या नाटकांमध्येही त्याने काम केलं आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजन