Join us

टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 11:42 IST

दोघांना तारा ही गोंडस मुलगी आहे. तसंच त्यांनी दोन मुलांना दत्तकही घेतलं आहे.

अभिनेता जय भानुशाली आणि पत्नी माही विज टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कपल आहे. २०११ मध्ये दोघांचं थाटात लग्न झालं. त्यांना २०१९ साली तारा ही गोंडस मुलगी झाली. लेकीबरोबरचे अनेक व्हिडिओ दोघं पोस्ट करत असतात. सोशल मीडियावर त्यांचे व्लॉग व्हायरल होत असतात. पण आता जय आणि माहीबद्दल वेगळीच माहिती समोर येत आहे. काही काळापूर्वीच दोघांचा घटस्फोट झाला आहे.

'हिंदुस्तान टाइम्स' रिपोर्टनुसार,जय भानुशाली आणि माही विजचा संसार मोडला आहे. दोघांनी नातं सावरण्याचा प्रयत्न केला पण काहीच बदल झाला नाही. काही महिन्यांपूर्वीच जोडी वेगळी झाली आहे. यावर्षीच दोघांनी कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. जुलै-ऑगस्टमध्येच दोघांनी घटस्फोटाच्या अर्जावर सही केली. मुलांच्या कस्टडीवरही त्यांचा निर्णय झाला आहे. दोघांचा एकमेकांवर विश्वासच राहिलेला नव्हता हेच त्यांच्या घटस्फोटाचं कारण आहे असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. बऱ्याच काळापासून दोघांनी एकमेकांसोबत फोटो शेअर करणंही बंद केलं. जून २०२४ मध्ये दोघांची शेवटची कोलॅब पोस्ट होती. अद्याप दोघांनी घटस्फोटावर अधिकृत भाष्य केलेलं नाही. 

याआधीही दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा झाल्या आहेत. तेव्हा माहीने 'मी तुम्हाला का सांगू? तुम्ही माझे काका आहात का?' अशी  प्रतिक्रिया दिली होती. जय आणि माहीला तारा ही मुलगी आहे. शिवाय दोघांनी दोन मुलांना दत्तकही घेतलं आहे. आता दोघांचा १४ वर्षांचा संसार मोडला आहे यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jay Bhanushali and Mahhi Vij rumored to divorce after 14 years.

Web Summary : Popular TV couple Jay Bhanushali and Mahhi Vij are reportedly divorcing after 14 years of marriage. Sources say irreconcilable differences led to the split, finalized recently. They have a daughter, Tara, and adopted two children.
टॅग्स :जय भानुशालीटिव्ही कलाकारघटस्फोट