Join us

शाहरुखचा जबरा फॅन! 'जवान' प्रदर्शित झाल्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं टक्कल, Video पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 15:26 IST

Video : 'जवान'ची क्रेझ! मराठी अभिनेत्याने केला शाहरुखसारखा लूक, व्हिडिओ पाहिलात का?

बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘जवान’ हा बॉलिवूड चित्रपट आज(७ सप्टेंबर) सर्वत्र प्रदर्शित झाला. ‘पठाण’नंतर किंग खानच्या या चित्रपटाची गेले कित्येक दिवस प्रेक्षक वाट पाहत होते. या चित्रपटाच्या अडव्हान्स बुकिंगला शाहरुखच्या चाहत्यांनी दमदार प्रतिसाद दिला. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही थिएटर हाऊसफूल होत आहेत. ‘जवान’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानचे थिएटरमधील अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. जिकडेतिकडे शाहरुखच्या चाहत्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. शाहरुखचा जबरा फॅन असलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्विक प्रताप शाहरुख खानचा चाहता आहे. याबद्दल त्याने मुलाखतीतही भाष्य केलं होतं. आता शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटासाठी त्याने खास लूक केला आहे. ‘जवान’ चित्रपटातील शाहरुखचा टक्कल केला लूक प्रचंड व्हायरल झाला होता. त्याचा हा लूक पाहून चाहतेही थक्क झाले होते. असाच लूक अभिनेता पृथ्वीक प्रतापने केला आहे. या लूकमधील व्हिडिओ पृथ्विकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पृथ्विक शाहरुखच्या हूक स्टेप्स करताना दिसत आहे.

"शाहरुख खानने हात धरला, मिठी मारली अन्...", 'जवान' फेम गिरीजा ओकने सांगितला 'तो' किस्सा 

पृथ्विकने हा व्हिडिओ शेअर करत “जवानच्या पार्श्वभूमीवर हे रील आणि दहिहंडीच्या पार्श्वभूमीवर माझी हंडी म्हणजे माझं टक्कल सादर करतोय,” असं म्हटलं आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हास्यजत्रेतील कलाकारांनीही या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

“दिग्दर्शकाला भेटायला गेले तेव्हा...”, गिरीजा ओकने सांगितला ‘जवान’चा अनुभव, म्हणाली, “मी दोन वर्ष...”

दरम्यान, अटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपथी यांच्या मुख्य भूमिका आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने या चित्रपटात पाहुणी कलाकाराची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक ‘जवान’मध्ये झळकली आहे.

टॅग्स :जवान चित्रपटशाहरुख खानमहाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार