Join us
Daily Top 2Weekly Top 5

केलेल्या चुकीची जान्हवीला झाली जाणीव, हात जोडून मागितली माफी! पॅडी म्हणाला- "बाहेर गेल्यावर मी तुझ्यासोबत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 09:34 IST

पॅडीच्या अभिनयावर टीका केल्याने नंतर जान्हवीला पश्चाताप झाला असून तिने पॅडीची माफी मागितली आहे (bigg boss marathi 5)

काल संपूर्ण महाराष्ट्रात बिग बॉस मराठीचा एक मुद्दा प्रचंड गाजला. तो म्हणजे जान्हवीने पॅडीचा केलेला अपमान. पॅडीच्या अभिनयाबद्दल जान्हवीने अपमानास्पद टीका केली. याशिवाय त्याला जोकर म्हणून हिणवलं. यामुळे जान्हवीविरुद्ध सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील विविध कलाकारांनी जान्हवीविरुद्ध संताप व्यक्त केलाय. काल मात्र बिग बॉसच्या घरात केलेल्या वक्तव्याप्रकरणी जान्हवीने पॅडीची माफी मागितली. 

जान्हवीने मागितली माफी, पॅडी म्हणाला...

जान्हवी काल गार्डन एरियामध्ये आली होती. ती पॅडीला सॉरी म्हणाली. त्यावर पॅडी म्हणाला, "मला वाटलं कधीतरी हे बोलावं लागेल तुझ्याशी. माझ्यासमोर तर काही नाही झालं. मला असं ओझरता आवाज आला.  तेव्हा मी देवाकडे प्रार्थना केली होती की, तुला खूप मोठी अभिनेत्री बनव आणि तुला पुढे एवढा स्टँड घेता येईल की या माणसासोबत मी काम करणार नाही. हा माणूस जर प्रोजेक्टमध्ये असेल तर मी काम करणार नाही."

पॅडी पुढे म्हणाला, "मी काय करु शकतो तर जेव्हा मला कळेल की, जान्हवी किल्लेकर आहेत तर मी काम नाही करणार. असं मी ठरवलं होतं, पण मी माणूस आहे. बाप आहे, भाऊ आहे. आपण एकमेकांचा जीव खाऊन भांडू. पण एकमेकांची करिअर एक भाषेचा स्तर याचं भान ठेऊ. एकमेकांचा रिस्पेक्ट करु" पॅडीच्या या कृतीचं नेटकऱ्यांनी चांगलंच कौतुक केलंय.

जान्हवी पॅडीला काय म्हणाली होती?

जान्हवी 'सत्याचा पंचनामा' टास्क झाल्यावर मोठ्या आवाजात पॅडीला म्हणाली, "पॅडीदादाच्या काहीतरी अंगात घुसलंय. आयुष्यभर ओव्हरअ‍ॅक्टिंग करुन करुन दमले. आता तीच ओव्हरअ‍ॅक्टिंग घरात दाखवत आहेत." पॅडीने हे ऐकलं. तो आतमध्ये वर्षा उसगावकर आणि अंकिता वालावरसोबत बसला होता. पॅडी म्हणाला, "ती आपल्या अ‍ॅक्टिंगबद्दल वगैरे बोलते. तिला बाहेर आल्यावर इतकं भोवेल ते. तिला खूप त्रास होईल. एका इंडस्ट्रीत आहोत कधी ना कधीतरी क्लॅश होणार. मला आशा आहे की तिला कळेल की पॅडी कांबळे असेल तर मी काम नाही करणार. मी देवाकडे याविषयी प्रार्थना करतो."

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठीटेलिव्हिजन