Join us

श्रीरामांच्या भूमिकेसाठी दिलेली ऑडिशन कोणाला आवडली नाही पण..; अरुण गोविल यांची 'रामायण'साठी निवड कशी झाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 14:43 IST

अरुण गोविल यांना कशी मिळाली रामायणातील भूमिका? 'रामनवमी'निमित्त वाचा हा खास किस्सा (arun govil, ramayan)

रामानंद सागर यांची 'रामायण' (ramayan) मालिका सर्वांच्या आवडीची. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही मालिका आवडते. कोरोना काळात जेव्हा दूरदर्शनवर 'रामायण' मालिका पुन्हा टेलिकास्ट ढाली तेव्हा या मालिकेने रेकॉर्डब्रेक व्ह्यूअरशीप मिळवली. या मालिकेत अभिनेते अरुण गोविल (arun govil) यांनी प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली. अरुण यांनी या भूमिकेसाठी सुरुवातीला ऑडिशन दिली. लूक टेस्टही झाली पण नंतर ते रिजेक्ट झाले. पण एका छोट्याश्या गोष्टीमुळे अरुण गोविल यांना 'रामायण' मालिका कशी ऑफर झाली, याचा खास किस्सा वाचा आजच्या रामनवमीनिमित्त

अशी मिळाली अरुण गोविल यांना प्रभू श्रीरामांची भूमिका

अरुण गोविल यांनी एका मुलाखतीत हा किस्सा शेअर केला. त्यांना 'रामायण' मालिकेतील भूमिका कशी मिळाली याविषयी ते म्हणाले की, "मला आठवतंय, मी प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. परंतु मी अपयशी ठरलो. पुढे काय झालं माहित नाही. मी या भूमिकेसाठी श्रीरामांच्या भूमिकेशी मिळताजुळता मेकअप आणि फोटोशूट  केलं होता. परंतु फोटो पाहून श्रीरामांसारखा दिसत नाही, असं मलाच जाणवलं. त्यानंतर चेहऱ्यावर स्माईल ठेऊन पुन्हा एकदा स्क्रीन टेस्ट दिली. ती टेस्ट सर्वांना आवडली आणि प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी माझी  निवड झाली."

अशाप्रकारे अरुण गोविल यांनी त्यांना 'रामायण' मालिका कशी मिळाली याचा खास किस्सा शेअर केला.आजही प्रभू श्रीराम यांच्या रुपात अरुण गोविल यांनाच सर्वजण मानतात. अनेक जणांनी आजवर श्रीरामांची भूमिका  साकारली. परंतु अरुण यांच्या अभिनयाचा ठसा पुसला गेला नाही. अरुण यांनी 'रामायण' मालिकेत श्रीरामांची भूमिका अक्षरशः जिवंत केली. अरुण यांनी नंतरच्या कारकीर्दीत अनेक भूमिका साकारल्या. परंतु त्यांनी साकारलेले श्रीराम अजरामर झाले.

टॅग्स :राम नवमीरामायणश्रीरामपूरबॉलिवूडटेलिव्हिजन