Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या २२ व्या वर्षी अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं नवं घर; दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर केला गृहप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 11:10 IST

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने वयाच्या २२व्या वर्षी मुंबईत खरेदी केलं स्वत:चं घर, शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो.

Anushka Sen : अभिनेत्री अनुष्का सेन (Anushka Sen) हा टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. वेगवेगळ्या हिंदी मालिकांमध्ये काम करून तिने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. 'बालवीर' या मालिकेतून खऱ्या अर्थाने ती नावारूपाला आली. सध्या अनुष्का सोशल मीडियावर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच अनुष्काची स्वप्नपूर्ती झाली आहे. मायानगरी मुंबईत तिनं नवं घर खरेदी केलं आहे. 

वयाच्या २२ व्या वर्षी अभिनेत्रीने मुंबईत तिचं हक्काचं घर घेतलं. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनुष्काने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीसोबत तिच्या घरची मंडळी देखील आहे. गृहप्रवेश! एक नवी सुरूवात, नवीन घर तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. ओम नम: शिवाय! असं कॅप्शन देत अनुष्काने तिच्या घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट  केले आहेत. 

अनुष्काने याआधी अवघ्या १७व्या वर्षी BMW गाडी खरेदी केली होती. त्यानंतर आता ती घराची मालकीण झाली आहे. अनुष्काचा जन्म हा रांचीमधील एका बंगाली कुटुंबात झाला. त्यानंतर तिचं संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं. अगदी कमी वयातच साधारणत २००९ मध्ये तिने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. 

अनुष्का 'बालवीर', 'झांसी की रानी' तसेच 'खतरों के खिलाडी सीझन-११ 'मध्ये झळकली आहे. शिवाय 'दिल दोस्ती डिलेमा' सीरिजमध्ये देखील ती पाहायला मिळाली. आता कोरियन सिनेसृष्टीत ती पदार्पण करणार आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमुंबईसोशल मीडिया