Join us
Daily Top 2Weekly Top 5

"उद्या काय होईल माहीत नाही...", लग्नात पती रॉकीबद्दल बोलताना हिना खान भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 11:07 IST

रॉकी आणि हिनाच्या लग्नाचा भावनिक व्हिडिओ

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) दोन दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालसोबत (Rocky Jaiswal) तिने रजिस्टर मॅरेज केलं. हिना अजूनही ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. तिच्या या कठीण प्रसंगात रॉकी तिच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. हिनाने अनेकदा व्हिडिओंमधून रॉकी तिची कशी काळजी घेतोय हे दाखवलं होतं. आता दोघंही कायमचे एकमेकांचे झाले आहेत. लग्नात रॉकीबद्दल बोलताना हिना भावुक झाली. ती नक्की काय म्हणाली?

हिना खानने पती रॉकीसाठी खास दोन शब्द मांडले. त्यांनी इन्स्टाग्रामवर लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये हिना म्हणते, "मी काही शब्द बोलू इच्छिते. हे कोणती प्रतिज्ञा नाही. ही एक भावना आहे. आपल्यावर कोणीतरी प्रेम करणं हे खूप सुंदर आहे. पण माझ्या आयुष्यातील सर्व अनिश्चिततेसह मला स्वीकारणं, उद्या काय होईल मला माहीत नाही माझ्या सर्व दोषांसह एका महिलेला स्वीकारणं हा माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे. धन्यवाद."

"ती माझ्यासाठी माझं सगळं आहे. ती माझी आत्मा, माझं हृदय आहे. ती सगळं काही छान करते. ती हसली तरच मला सर्वकाही अर्थपूर्ण वाटतं. त्यामुळे ती हसत राहावी याची सर्वांनीच काळजी घ्यावी. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे."

यानंतर दोघंही कायदेशीररित्या लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचा हा व्हिडिओ खूपच सुंदर आहे. यामध्ये हिनाने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला लेहेंगा परिधान केला आहे. बेबी पिंक लेहेंग्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. हिना आणि रॉकी अनके वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. हिनाला कॅन्सरचं निदान झाल्यावरही रॉकीने तिची साथ सोडली नाही. आता दोघंही कायमचे लग्नबंधनात अडकले आहेत.

टॅग्स :हिना खानटिव्ही कलाकारलग्न