Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hina Khan : हिना खानला अखेर करावं लागलं टक्कल, ब्रेस्ट कॅन्सरशी धीरानं तोंड देतेय अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 10:20 IST

अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरची शिकार झाली आहे.

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक हिना खान (Hina Khan) तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्टच्या  कॅन्सरने ग्रस्त आहे. हिनाला स्टेज 3 कॅन्सरचं निदान झालं असून सध्या ती उपचार घेत आहे. हिना मात्र या परिस्थितीतही अतिशय स्थिर आणि संयमी दिसून येत आहे. कॅन्सरशी खंबीरपणे लढा देणाऱ्या हिनानं टक्कल केल्याचं दिसून येत आहे. 

हिनाला जेव्हा कॅन्सरचं निदान झालं. तेव्हा तिनं उपचार सुरू होताच केस कापले होते. कारण, किमोथेरेपीमुळे केस गळतात. त्यामुळे आधीच हिंमत दाखवत हिनाने तिचे केस छोटे केले. पण, आता तिला टक्कल करावं लागलं आहे. हिनाने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिच्या डोक्यावर टोपी दिसून येत आहे. हिनाने डोक्यावरील सर्व केस कापले असून टक्कल केलं आहे. असं असतानाही तिनं चेहऱ्यावर हास्य ठेवून एका स्किनकेअर ब्रँडचं प्रमोशन केलंय. हिनाची हिंमत पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. 

हिना खानने तिच्या कॅन्सरची बातमी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने सांगितले होते की हा काळ नक्कीच कठीण आहे, पण तिला धैर्याने आणि पूर्ण आशेने सामोरे जायचे आहे. हिनासाठी हा काळ खूप कठीण आहे, पण की ज्या धैर्याने या कठीण प्रसंगाचा सामना करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. हसतमुख चेहरा आणि अतूट धैर्याने कर्करोगाचा सामना करणाऱ्या हिना खानने चाहत्यांसाठी एक आदर्श ठेवला आहे. 

टॅग्स :हिना खानसेलिब्रिटीटेलिव्हिजनसोशल मीडियाकर्करोग