Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालिकेनंतर आता हिंदी कॉमेडी शोमध्ये झळकणार हेमांगी कवी; म्हणाली, "महाराष्ट्राला हसवून झालं आता..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 16:33 IST

हेमांगी कवीची हिंदी कॉमेडी शोमध्ये वर्णी लागली आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे.

मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी सध्या चर्चेत आली आहे. नाटक, मालिका आणि सिनेमांतून काम करत हेमांगीने अभिनयाचा ठसा उमटवला. हेमांगी सध्या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अशातच तिची आता एका हिंदी कॉमेडी शोमध्ये वर्णी लागली आहे. हेमांगीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती चाहत्यांना दिली आहे. 

हेमांगी कवी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. कॉमेडी शोबद्दलही तिने पोस्ट शेअर केली आहे. हेमांगी 'Madness को मचाएंगे India को हसाएंगे' या कॉमेडी शोमध्ये झळकणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला असून यामध्ये तिची झलक पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने "महाराष्ट्राला हसवून झालं आता संपूर्ण भारताला हसवायला येतोय", असं कॅप्शन दिलं आहे. 

हेमांगीबरोबरच या कॉमेडी शोमध्ये कुशल बद्रिकेदेखील सहभागी होणार आहे. ९ मार्चपासून सोनी टीव्हीवर हा शो प्रसारित केला जाणार आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी हेमांगीचं अभिनंदन केलं आहे. अभिनेत्री किशोरी शहाणेंनी या पोस्टवर कमेंट करत "वाह अभिनंदन" असं म्हणत हेमांगीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

सध्या हेमांगी 'कैसे मुझे तुम मिल गयी' या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. 'ताली' आणि 'दो गुब्बारे' या वेब सीरिजमध्येही हेमांगी झळकली होती. 

टॅग्स :हेमांगी कवीटिव्ही कलाकार