Join us

'ही पोरी कोणाची?' हेमांगी कवीच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 16:24 IST

Hemangi kavi: व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये हेमांगीने कोळीण बाईप्रमाणे गेटअप आणि मेकअप केला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (hemangi kavi). उत्तम अभिनयशैली आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे हेमांगी कायम चर्चेत येत असते. अनेकदा तिच्या याच स्वभावामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. हेमांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यामध्ये अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती एका कोळणीच्या वेशात दिसून येत आहे.

हेमांगीचा कलाविश्वात तगडा वावर आहे. नाटक, मालिका, सिनेमा आणि ओटीटी अशा सगळ्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.  त्यामुळे सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. यामध्येच तिने शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमालीचे कमेंट आणि लाइक्स करत असतात. असाच हेमांगीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिने पारंपरिक कोळी बांधवाचा लूक केला आहे. त्यामुळे हा फोटो नेमका हेमांगीच्या आगामी प्रोजेक्टचा आहे की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये हेमांगीने कोळीण बाईप्रमाणे गेटअप आणि मेकअप केला आहे. त्यामुळे हेमांगी आता कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. परंतु, हेमांगीचा हा फोटो कोणत्याही प्रोजेक्टचा नसून एका ऑडिशन दरम्यानचा आहे.त्यामुळे तिने थ्रोबॅक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. “आय-बापाची लाराची लेक मी लारी!”, असं कॅप्शन तिने हा फोटो शेअर करत दिलं आहे.

दरम्यान,  या फोटोमध्ये हेमांगीने गुलाबी रंगाची फ्लोरल प्रिंटची साडी, कानात सोन्याचे झुमके, गळ्यात डोरलं, नाकात नथ, केसांचा खोपा आणि त्यावर गुलाबाचं फूल तसंच कपाळावर लाल टिकली असा गेटअप केला आहे. 

टॅग्स :हेमांगी कवीसेलिब्रिटीटेलिव्हिजन