Join us

जयदीपची रिअल लाइफ फॅमिली पाहिलीये का? पाहा मंदार जाधवच्या कुटुंबाचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 17:08 IST

Mandar jadhav: पहिल्यांदाच त्याने सहकुटुंब सहपरिवारासोबत म्हणजेच त्याच्या रिअल लाइफ परिवारासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याचे आई-वडीलदेखील दिसून येत आहेत.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे मंदार जाधव. या मालिकेत मंदारने जयदीप ही भूमिका साकारली असून अल्पावधीत तो लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. उत्तम अभिनयामुळे कायम चर्चेत येणारा मंदार सोशल मीडियावरही तितकाच चर्चेत असून सध्या त्याच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

कलाविश्वाप्रमाणेच मंदार सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा तो सेटवरील वा सहकलाकारांसोबतचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतो. यात बऱ्याचदा त्याने मालिकेतील कलाकारांसोबत फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळालं. आता मंदारच्या ऑनस्क्रीन फॅमिलीचे फोटो साऱ्यांनीच पाहिले आहेत. मात्र, पहिल्यांदाच त्याने सहकुटुंब सहपरिवारासोबत म्हणजेच त्याच्या रिअल लाइफ परिवारासोबतचा फोटो शेअर केला आहे.

मंदार जाधवचा भाऊ देखील आहे अभिनेता; हिंदी मालिकांमध्ये आजमावतोय नशीब 

मंदारने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याची पत्नी, मुलगा, आई-वडील आणि धाकटा भाऊ दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत त्याने About last night असं कॅप्शन दिलं आहे. विशेष म्हणजे जाधव कुटुंबाचा हा एकत्र फोटो चाहत्यांना भलताच आवडला आहे.

दरम्यान, मंदारप्रमाणेच त्याचा धाकटा भाऊ आणि पत्नीदेखील लोकप्रिय कलाकार आहेत. मंदारच्या पत्नीचं नाव मितिका शर्मा असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तर, मंदारचा धाकटा भाऊ मेघन जाधव हिंदी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. मेघन याने विघ्नहर्ता गणेश,तेरा यार हू में, शुभारंभ, राधाकृष्ण, तेनाली रामा, महाकाली अंत ही आरंभ है, सीआयडी, क्राइम पेट्रोल आणि सावधान इंडिया अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन