Join us

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आणखी एक अभिनेता झी मराठीवर, झळकणार 'तारिणी' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:07 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणखी एका अभिनेत्याची झी मराठीवरील मालिकेत वर्णी लागली आहे. कोण आहे हा अभिनेता?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सर्वांचा आवडीचा शो. या शोमधील गौरव मोरे आता झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'मध्ये झळकतोय. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आणखी एक प्रसिद्ध अभिनेता झी मराठीवरील आगामी शोमध्ये झळकणार आहे. झी मराठीवर लवकरच 'तारिणी' ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेमध्ये हास्यजत्रेत झळकलेला लोकप्रिय अभिनेता काम करणार आहे. हा अभिनेता म्हणजे प्रशांत केणी. प्रशांत झळकणार 'तारिणी' मालिकेत

प्रशांत केणी हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये काही एपिसोडमध्ये दिसला होता. हास्यजत्रेतील नवीन आणि आश्वासक चेहरा म्हणून प्रशांत केणीची ओळख होती. प्रशांतने काही भागानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'शोला रामराम ठोकला. दरम्यानच्या काळात तो विविध मालिकांमध्ये दिसला. इतकंच नव्हे प्रशांतने अभिनेता आनंद इंगळे यांच्यासोबत 'नकळत सारे घडले' या नाटकात अभिनय केला. हे नाटक प्रचंड गाजलं. आता पुन्हा एकदा प्रशांत 'तारिणी' मालिकेनिमित्त पुन्हा एकदा टीव्हीवर अभिनय करताना दिसतेय. 

झी मराठीवर काहीच दिवसांपूर्वी  'तारिणी' या नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. शिवानी सोनार या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत आहे. तसंच अभिज्ञा भावेचीही भूमिका आहे. एन स्वराज मुख्य अभिनेता आहे. मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. दरम्यान तारिणी मालिका सुरु झाल्याने कोणती मालिका निरोप घेणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तारिणी ही मालिका ११ ऑगस्टपासून रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांना झी मराठीवर बघायला मिळणार आहे. प्रशांतचे चाहते त्याला या मालिकेत बघण्यासाठी उत्सुक आहेत.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राचला हवा येऊ द्याटेलिव्हिजनटिव्ही कलाकार