मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. ही अभिनेत्री आहे जिया मनेक. 'साथ निभाना साथिया' मालिकेतील 'गोपी बहू'च्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जिया मनेक विवाहबंधनात अडकली आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड वरुण जैन सोबत गुपचूप लग्न केलं आहे. या लग्नाची माहिती जियाने स्वतः सोशल मीडियावर फोटो शेअर करून दिली आहे.
जियाच्या लग्नाची चर्चा
जिया मानेकने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. तिने वरुण जैनसोबत लग्नगाठ बांधली असल्याची माहिती दिली. जियाने लिहिले की, "आम्ही आयुष्यभरासाठी एकत्र आलो आहोत आणि आता आम्ही मिस्टर अँड मिसेस झालो आहोत." या दोघांनी 'भूत शुद्धी विवाह' या प्राचीन योग पद्धतीनुसार लग्न केले. या पद्धतीत शरीरातील पाच तत्त्वांना शुद्ध केले जाते. लग्नात जियाने गोल्डन रंगाची साडी, त्यावर पारंपरिक दागिने आणि लाल बांगड्या परिधान केल्या होत्या.