Join us

हळदीच्या अंगाने बाहेर गेला अन् गाडीने उडवलं; सिरियलचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी कपाळावर मारला हात, म्हणाले- "उठाले रे बाबा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:36 IST

सिरीयलमध्ये सध्या सुरू असलेला ट्रॅक पाहून आणि नवा प्रोमो पाहून चाहते चक्रावून गेले आहेत. सध्या 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका रंजक वळणावर आहे.

कधी कधी मालिकेत असं काही दाखवलं जातं ज्यामुळे प्रेक्षकांचीही कपाळावर हात मारण्याची वेळ येते. असंच काहीसं 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेचा नवा प्रोमो बघून प्रेक्षकांचं झालं आहे. सिरीयलमध्ये सध्या सुरू असलेला ट्रॅक पाहून आणि नवा प्रोमो पाहून चाहते चक्रावून गेले आहेत. सध्या 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका रंजक वळणावर आहे.

मालिकेत ऐश्वर्याने जानकीच्या आईला किडनॅप केलं आहे. आणि तिला सोडण्याच्या बदल्यात ऐश्वर्या ऋषिकेशसोबत लग्न करण्याची अट ठेवते. ऋषिकेश आणि जानकी ऐश्वर्याचं कारस्थान उघड करण्याचे पूरेपूर प्रयत्न करत आहेत. याचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये दिसतंय की ऋषिकेश आणि ऐश्वर्याच्या हळदीचा कार्यक्रम सुरू आहे. ऋषिकेश आणि जानकी त्यांच्या बेडरुममध्ये असताना कुणीतरी त्यांचं बोलणं ऐकत असल्याचं जानकी बघते. ऋषिकेश त्या व्यक्तीला पकडण्यासाठी त्याच्या मागोमाग पळत घराबाहेर जातो. 

ऋषिकेशची आई म्हणते- "हळदीच्या अंगाने घराबाहेर जायचं नसतं" आणि तेवढ्यात त्याचा अपघात होतो. ऋषिकेशचा अपघात झालेला पाहून जानकी जोरात ओरडल्याचंही पाहायला मिळत आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेचा हा नवा प्रोमो पाहून मात्र प्रेक्षकांनी कपाळावर हात मारला आहे. या मालिकेतील कथानकावर प्रेक्षक चिडले आहेत. या प्रोमोवर त्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

"आता याची मेमरी जाणार", "बापरे केवढा मोठा अपघात झाला", "किती ते फालतुगिरी चालू आहे काय माहित...अजब लेखक", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. "झालं परत आता खूप सारे एपिसोड वाढले. उठाले रे बाबा मेरे को नही ऐ सिरियल बनाने वाले को", "यांचे सगळे दिवस एकतर डॉक्टर नाहीतर कोर्टमध्ये जातात", अशा मजेशीर कमेंटही केल्या आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्रवाहरेश्मा शिंदे