Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला धक्काच बसला...", अजित पवारांच्या निधनावर गौतमी पाटीलची भावुक प्रतिक्रिया, म्हणाली-"आम्ही कधी भेटलो नाही, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:18 IST

अजित पवारांबद्दल बोलताना गौतमी पाटील झाली भावुक, म्हणाली- "प्रत्येक कलाकाराला त्यांचा पाठिंबा..."

Gautami Patil Reaction On Ajit Pawar Death : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यभरात शोककळा पसरली आहे. अजित पवार बारामती दौऱ्यावर असताना ही घटना घडली. त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. राजकीय क्षेत्रासह मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वातूनही त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं जात आहे. अशातच नृत्यांगना गौतमी पाटीलने त्यांच्या निधनाबद्दल भावुक प्रतिक्रिया दिली आहे. 

अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्राने एक धडाकेबाज नेता गमावला आहे. नुकतीच गौतमी पाटीलने अभिजात मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली," मला आईने त्यांच्या निधनाबद्दल सांगितलं. ती बातमी ऐकून मला धक्काच बसला. माझा विश्वासच बसत नव्हता. दादांच्या बाबतीत असं काही घडेल असं कधीच वाटलं नव्हतं."

पुढे गौतमी म्हणाली,"आजवर मी दादांना कधीच भेटले नाही. पण, त्यांनी कायम मला पाठिंबा दिला आहे. म्हणजे मला सपोर्ट करत ते जे काही बोलायचे ते माझ्यासाठी खूप होतं. दादा महाराष्ट्राचे लाडके नेते होते. पण, त्यांच्याबाबत जे काही झालं ते खूप चुकीचं झालं. त्यांनी प्रत्येक कलाकाराला पाठिंबा दिला आहे. जर कोणी त्यांच्याकडे काही काम घेऊन गेलं तर ते काम शंभर टक्के होणार याचा विश्वास असायचा. मला वाटतं महाराष्ट्र कधीच त्यांना विसरू शकेल. अख्ख्या महाराष्ट्राचे ते लाडके नेते होते आणि कायम असतील." अशा भावना गौतमीने यावेळी व्यक्त केल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gautami Patil's emotional reaction to Ajit Pawar's death: 'Shocked'

Web Summary : Gautami Patil expressed shock and sadness over Ajit Pawar's demise. Though never met, she felt his support. She acknowledged Pawar's backing of artists and his commitment to helping people, emphasizing his popularity and irreplaceable presence in Maharashtra.
टॅग्स :गौतमी पाटीलअजित पवारमृत्यू