Join us

लग्नानंतर स्वानंद करु लागला गौतमीची तक्रार?; सांगितली अभिनेत्रीची न आवडणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 18:52 IST

Gautami deshpande: गौतमी आणि स्वानंद यांनी २५ डिसेंबर रोजी मोठ्या धुमधडाक्यात लग्नात केलं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे (gautami deshpane). 'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या गौतमीने काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली. २५ डिसेंबरला मोठ्या धुमधडाक्यात गौतमीने स्वानंद तेंडूलकर याच्यासोबत लग्न केलं. या लग्नाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे अजूनही त्यांच्या लग्नसोहळ्यातील मेहंदी, हळद, संगीत यांसारख्या समारंभाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

गौतमी आणि स्वानंद यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये स्वानंदने गौतमीची न आवडणारी गोष्ट सांगितली आहे. तसंच त्यांची पहिली भेट कुठे झाली, कोणी कोणाला प्रपोज केलं यासांरख्या अनेक गोष्टींचा त्यांनी उलगडला केला. या मुलाखतीमध्ये दोघांनाही एकमेकांची आवडणारी आणि खटकणारी गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर स्वानंदने गौतमीची न आवडणारी गोष्ट सांगितली.

"मला हिची एक सवय बदलायला आवडेल ती म्हणजे आळस. आमच्याकडे आळस खूप आहे. आणि तो साधासुधा नाही तर एक पोतं भरुन आहे. एकदम पद्धतशीर. पण तो कधी, जेव्हा काहीही काम नसतं त्यावेळी. उदाहरणार्थ, आता तिला मुलाखतीला यायचं होतं, तर ती माझ्या आधीच तयार होऊन बसली होती. पण, दर तिला काही करायचं नसेल. तर तेव्हा ती उठणारही नाही. अशा वेळी तिला कोणीतरी उठवून दाखवावं. ती उठणारच नाही. तिची ही सवय मला बदलायची आहे", असं स्वानंद म्हणाला.

दरम्यान, गौतमीमुळे मी सुद्धा थोडा आळशी झालोय असंही त्याने यावेळी सांगितलं. गौतमी सध्या 'गालिब' या नाटकात काम करताना दिसत आहे. तर स्वानंद हा भाडिपाचा बिझनेस हेड आहे. 

टॅग्स :गौतमी देशपांडेसेलिब्रिटीटिव्ही कलाकार