Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: आईबाबा झाल्याचा आनंद! जुळ्या मुलांच्या जन्मानंतर टीव्ही कपल पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 16:05 IST

१४ वर्ष वयातलं अंतर आणि PCOD चा सामना केल्यानंतर पाच वर्षांनी दोघं आईबाबा झाले आहेत

'सूर्यपूत्र कर्ण' फेम अभिनेता गौतम रोडे (Gautam Rode) आणि अभिनेत्री पंखुरी अवस्थी (Pankhuri Awasthi) नुकतेच आई बाबा झाले आहेत. पंखुरीने चार दिवसांपूर्वीच जुळ्या मुलांना जन्म दिला. एक मुलगा आणि एक मुलगी यांच्या जन्माने त्यांचं कुटुंब आता पूर्ण झालं आहे. लग्नानंतर पाच वर्षांनी या गोड कपलने ही आनंदाची बातमी दिली. पंखुरी आणि दोन्ही बाळांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून कपलच्या चेहऱ्यावर आईबाबा झाल्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे.

गौतम रोडे आणि पंखुरी हे टीव्हीवरचं लोकप्रिय कपल आहे. दोघांमध्ये तब्बल १४ वर्षांचं अंतर आहे. तसंच पंखुरीला पीसीओडी(PCOD) चा त्रास असल्यानेही ते काही वर्षांपासून बाळासाठी प्रयत्न करत होते. अखेर त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि जुलै महिन्यात पंखुरीने जुळ्या मुलांना जन्म दिला. २५ जुलै रौजी या दोन्ही गोंडस बाळांचा जन्म झाला. नुकतेच गौतम आणि पंखुरी रुग्णालयाबाहेर येताना दिसले. तसंच या बाळांचीही झलक पाहायला मिळाली. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी  यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

नुकतेच आईबाबा झालेल्या या गोड कपलच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतोय. पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांची पहिली भेट 'रजिया सुलतान' या टीव्ही शोच्या सेटवर झाली. २०१५ मध्ये 'सूर्यपुत्र कर्ण' या टीव्ही शोच्या सेटवर दोघे पुन्हा भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. फेब्रुवारी २०१८मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या पाच वर्षांनंतर ते आईबाबा झाले आहेत. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच इशिता दत्ता आणि वत्सल शेठ यांनाही मुलगा झाला आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजननवजात अर्भक