Join us
Daily Top 2Weekly Top 5

'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 16:18 IST

गौरव मोरेने हास्यजत्रेतून का घेतली एक्झिट?

'फिल्टरपाड्याचा बच्चन' अशी ओळख मिळवलेला हास्यजत्रेचा 'हुकमी एक्का' गौरव मोरेने (Gaurav More) काही दिवसांपूर्वीच कार्यक्रमातून निरोप घेतला. आता तो सोनी वरील 'मॅडनेस मचाएंगे' या हिंदी कॉमेडी शोमध्ये दिसत आहे. गौरवने दोन दिवसांपूर्वीच भावनिक पोस्ट शेअर करत 'हास्यजत्रा' सोडत असल्याची अधिकृत माहिती दिली. यावर चाहत्यांनी कमेंट करत नाराजी दर्शवली. चाहत्यांच्या कमेंटला गौरवने उत्तरं दिली आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने गौरव मोरेला खरी ओळख दिली. पण आता त्याने कार्यक्रमातून निरोप घेतला आहे. गौरवने हास्यजत्रेच्या रिकाम्या स्टेजचा ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ शेअर करत भावनिक पोस्ट केली. यावर एका चाहत्याने लिहिले, 'ओंकार भोजनेसारखा चुकीच्या शोमध्ये जाऊन इमेज खराब नका करून घेऊ भाऊ. तुम्ही हास्यजत्रेमध्येच शोभता..तरी हा आपला वैयक्तिक निर्णय शुभेच्छा.' गौरव मोरेने चाहत्याच्या कमेंटवर उत्तर देत लिहिले, 'प्रत्येक गोष्टीला कारण असतात दादा'. 

आणखी एका चाहत्याने गौरव मोरेच्या पोस्टवर तिखट प्रतिक्रिया देत लिहिले, 'पैसा बहुत कमिनी चीज है'. यावर गौरव म्हणतो, 'Respect बडी चीज है भाई.' कार्यक्रम का सोडला याचाही विचार होऊ द्या अशी प्रतिक्रिया त्याने चाहत्यांना दिली आहे.

गौरव मोरेचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळेच त्याचा जो निर्णय आहे त्याला चाहते पाठिंबा देत आहेत. मात्र तरी हास्यजत्रा सोडल्याने चाहत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. गौरव मोरे आता सिनेमांमध्येही झळकत आहे. त्याचे आगामी 'महापरिनिर्वाण', 'अल्याड पल्याड' हे सिनेमे येणार आहेत. याशिवाय तोआधी 'अंकुश', 'लंडन मिसळ', 'बॉईज 4' मध्येही दिसला आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीमहाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेतासोशल मीडिया