Join us

अभिनय बेर्डेला बोलणाऱ्या नेटकऱ्यावर गौरव मोरे भडकला, म्हणाला, 'जरा भान ठेवा...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 15:54 IST

एका नेटकऱ्याने अभिनयवर टीका केली होती. याच कमेंटला गौरवने जशास तसं उत्तर दिलं.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) मधून लोकप्रिय झालेला 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे (Gaurav More) आता हिंदी कॉमेडी शो 'मॅडनेस मचाएंगे' मध्ये दिसत आहे. गौरवने काही दिवसांपूर्वी हास्यजत्रेला निरोप देत असल्याची एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. त्याच्या पोस्टवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. यातच अभिनय बेर्डेनेही कमेंट केली होती. त्याच्या कमेंटवर एका नेटकऱ्याने अभिनयवर टीका केली होती. याच कमेंटला गौरवने जशास तसं उत्तर दिलं होतं.

गौरव मोरे आणि अभिनय बेर्डे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांनी एका मराठी सिनेमात एकत्र कामही केलं आहे. गौरवने मोरेने शेअर केलेल्या भावूक पोस्टवर अभिनय बेर्डेने कमेंट करत लिहिले,'ऑल द बेस्ट गौऱ्या, लव्ह यू!'  अभिनयच्या या कमेंटवर एका नेटकऱ्याने लिहिले,'अरे गौरव आर्ट कलाकार आहे आणि तू फक्त कलाकार आहेस. गौरव दादा किंवा सर म्हणायचे कष्ट घे'. यावर अभिनय उत्तर देत लिहितो,'विनोदाचा प्रयत्न चांगलाय पण गौऱ्या आर्ट नाही ऑल राऊंडर कलाकार आहे.'

नेटकऱ्याच्या या कमेंटवर गौरवनेही उत्तर देत लिहिलं,'आणि महत्वाचं आपण कोणाशी बोलतोय याचं भान ठेवा अभिनय बेर्डे हे एक प्रतिष्ठित नाव आहे त्यामुळे जरा जपून बोला.'

गौरव मोरे, अभिनय बेर्डे आणि नेटकऱ्यामध्ये कमेंटमध्ये झालेला संवाद व्हायरल होतोय. गौरव मोरेने हास्यजत्रा सोडली म्हणून अनेक चाहते निराश झालेत. 

टॅग्स :अभिनय बेर्डेमराठी अभिनेतासोशल मीडियाट्रोल