Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद समोर असूनही दुर्लक्ष केलं? गौरव मोरेने 'त्या' व्हायरल व्हिडीओवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला-

By देवेंद्र जाधव | Updated: July 25, 2025 09:32 IST

गौरव मोरेने प्रसादला इग्नोर केलं, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काय घडलं होतं नेमकं, जाणून घ्या

गौरव मोरे हा प्रसिद्ध अभिनेता. गौरवने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकलं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून गौरव काही महिन्यांपूर्वी बाहेर पडला. यानंतर गौरवने हिंदी रिअॅलिटी शोची वाट धरली. याशिवाय अनेक हिंदी, मराठी सिनेमांमध्ये काम केलंय. गौरवचा एक रील मधल्या काळात सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हायरल रीलमध्ये गौरवने प्रसाद खांडेकरकडे दुर्लक्ष केलं असल्याचं दिसलं. प्रसाद समोर असूनही गौरव त्याला भेटायला गेला नाही, अशी चर्चा सुरु झाली. अखेर गौरवने यावर स्पष्टीकरण दिलं.

प्रसादला खरंच इग्नोर केलं?

महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडल्यावर प्रसादशी काय नातं आहे? आणि त्या व्हायरल व्हिडीओचं सत्य काय? असं विचारताच गौरव म्हणाला, "त्याच्याआधी आम्ही बोललो होतो ना! भेटलो होतो आम्ही. त्यानंतर प्रसाद शशिकांत गंगावणेसोबत बोलत होता. मग तो मुलगा होता, त्याला माझ्यासोबत फोटो काढायचा होता. मी त्याला म्हटलं, जरा खूप ट्रॅफिकमधून आलोय. मी लगेच जाऊन येतो. हास्यजत्रातील सगळे कलाकार माझ्या संपर्कात आहेत. आम्ही सगळे मराठी कलामंच या एकाच ग्रुपमधले आहोत.",  अशाप्रकारे गौरव मोरेने त्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य सांगितलं. 

गौरव दिसणार चला हवा येऊ द्यामध्ये

गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. याच शोमध्ये गौरवने विविध कॅरेक्टर्स साकारून प्रेक्षकांचं मन जिंकलं. या शोनंतर गौरवने 'मॅडनेस मचाएंगे' या शोमध्ये काम केलं. आता गौरव 'चला हवा येऊ द्या'मध्ये दिसणार आहे. श्रेया बुगडे, कुशल बद्रिके या कलाकारांसोबत गौरव सर्वांना हसवायला सज्ज आहे. 'चला हवा येऊ द्या'चं नवीन पर्व उद्यापासून अर्थात २६ जुलैपासून रात्री शनिवार-रविवार रात्री ९ वाजता बघायला मिळणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राचला हवा येऊ द्याटेलिव्हिजनमराठी अभिनेतामराठी चित्रपट