Join us
Daily Top 2Weekly Top 5

फिटनेस फ्रिक अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी दिलं चाहत्यांना चॅलेंज, बघा तुम्हाला जमतंय का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 11:14 IST

ऐश्वर्या या फिटनेस फ्रिक आहेत.

झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर 'रुपाली राज्याध्यक्ष'ची भूमिका साकारत आहेत. अभिनय, सौंदर्य आणि फिटनेस या तिन्ही बाबतीत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना तोड नाही. ऐश्वर्या या फिटनेस फ्रिक आहेत. त्यांच्या सुंदर त्वचेचे व दाट केसांचे रहस्य व्यायाम आणि शुद्ध आहारच आहे. नुकतच त्यांनी चाहत्यांना एक फिटनेस चॅलेंज दिलं आहे. याचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. 

ऐश्वर्या या पन्नाशीच्या घरात असल्या तरीही त्या फिट अँड फाईन आहेत. ऐश्वर्या यांच्यासाठी निरोगी राहण्याचे मंत्र म्हणजे झोप, पौष्टीक आहार आणि व्यायामच आहे. ऐश्वर्या सोशल मिडियावर सक्रिय असून तिचा चाहतावर्गही मोठा आहे. ऐश्वर्या यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या चाहत्यांना फिटनेस चॅलेंज केलं आहे. पन्नाशीत सुद्धा ऐश्वर्या यांचा जबरदस्त फिटनेस पाहून चाहते कौतुक करत आहेत.

गेल्या २० वर्षांपासून ऐश्वर्या नारकर न चुकता जिम, वेट ट्रेनिंग आणि योग करत आहेत. तसेच त्या कायम त्यांच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असतात. वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा दोन्ही प्रकारच्या आऊटफिटमध्ये त्या वरचेवर फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. ऐश्वर्या नारकर या गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपट केले आहेत त्याच सोबत मराठी मालिका, नाटकं आणि अनेक हिंदी मालिकांचाही त्यात भाग आहे. त्यांनी पडद्यावरील अभिनयाची सुरुवात जाहिरातींद्वारे झाली असून अनेक आघाडीच्या ब्रँडचा ती चेहराही राहिल्या आहेत. 

 

टॅग्स :ऐश्वर्या नारकरसेलिब्रिटीटेलिव्हिजनफिटनेस टिप्स