Join us
Daily Top 2Weekly Top 5

घराबाहेर आल्यावर आयुष संजीव आणि ओमकार राऊतमध्ये हाणामारी? व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 09:49 IST

गेल्या आठवड्यात 'बिग बॉस मराठी ६'मधून बाहेर पडलेला स्पर्धक ओमकार राऊत आणि त्याच्यात हाणामारी झाल्याची चर्चा आहे. यासंबंधीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

'बिग बॉस मराठी ६' मधून काल आयुष संजीव घराबाहेर पडला. आयुष घरातील एक स्ट्राँग स्पर्धक होता. परंतु कमी मतं मिळाल्याने आयुषला 'बिग बॉस मराठी ६'मधून बाहेर जावं लागलं. आयुष घराबाहेर आल्यावर गेल्या आठवड्यात 'बिग बॉस मराठी ६'मधून बाहेर पडलेला स्पर्धक ओमकार राऊत आणि त्याच्यात हाणामारी झाल्याची चर्चा आहे. यासंबंधीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

आयुष आणि ओमकारमध्ये हाणामारीसोशल मीडिया स्टार निक शिंदेने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत निक आणि त्याचे मित्र 'बिग बॉस मराठी ६'चा कालचा भाग पाहत असतात. त्यावेळी एलिमिनेशनमध्ये आयुष-सचिन कुमावत आणि करण सोनावणेपैकी कोण जाईल, अशी चर्चा सुरु असते. सचिन कुमावत किंवा करण बाहेर पडतील, असं दोघेही म्हणतात. पुढे आयुष गुपचुप त्यांच्या मागे येऊन उभा राहतो. ''मलाही सचिनदादाच बाहेर पडतील असं वाटतंय'', असं आयुष त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणतो. आयुषला मागे पाहताच निक आणि त्याच्या मित्रांना धक्का बसतो.

इतक्यात ओमकार राऊत येतो. तो आयुषची कॉलर पकडतो. ''मला नॉमिनेट करता का रे!!! मला नॉमिनेट करतो! तुझ्या तर आईची...'' अशा शब्दात ओमकार आयुषला मारायला पुढे येतो. सर्वजण त्या दोघांना सावरतात. अर्थात हा हाणामारीचा व्हिडीओ खरा नसून तो एक गंमतीचा भाग आहे. आयुषने नॉमिनेट केल्याचा ओमकारच्या मनात राग असला तरीही घराबाहेर आल्यावर त्यांची चांगली मैत्री झाली आहे. एकूणच आयुष संजीव घराबाहेर पडल्याने घरातील एक चांगला खेळाडू बाहेर पडल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fight between Aayush Sanjeev and Omkar after Bigg Boss eviction?

Web Summary : Aayush Sanjeev's recent eviction from Bigg Boss Marathi 6 sparked rumors of a fight with Omkar Raut. A humorous video shows Omkar playfully confronting Aayush about a nomination, clarifying their friendship remains strong post-show.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६बिग बॉस १९टेलिव्हिजनटिव्ही कलाकार