Join us

"लग्नासाठी योग्य वय काय?", 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरी म्हणाली, "या प्रश्नाचं उत्तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 17:35 IST

जुईने नुकतंच इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना जुईने उत्तर दिली. एका चाहत्याने या सेशनमध्ये जुईला "लग्नासाठी योग्य वय काय?" असा प्रश्न विचारला होता. 

'पुढचं पाऊल' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. अल्पावधीतच तिने मालिकाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. 'पुढचं पाऊल' मालिकेने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर अनेक मालिकांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. सध्या 'ठरलं तर मग' या मालिकेतून जुई प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल ठरली आहे. 

'ठरलं तर मग'मुळे जुईच्या चाहत्या वर्गातही प्रचंड वाढ झाली आहे. जुई सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. मालिका आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्स जुई सोशल मीडियावरुन चाहत्यांना देत असते. जुईने नुकतंच इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना जुईने उत्तर दिली. एका चाहत्याने या सेशनमध्ये जुईला "लग्नासाठी योग्य वय काय?" असा प्रश्न विचारला होता. 

जुईने चाहत्याच्या या प्रश्नाला अगदी थेट उत्तर दिलं आहे. "या प्रश्नाचं उत्तर मी द्यायचं? वा...वा...किती छान, मी या प्रश्नाला दाद देते. खूप भारी", असं जुई म्हणाली. या सेशनमध्ये विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना जुईने व्हिडिओ शेअर करत उत्तर दिली. 

दरम्यान, 'ठरलं तर मग' ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेत जुई साकारत असलेल्या सायली या व्यक्तिरेखेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यातून अर्जुनने सायलीचे प्राण वाचवले. या प्रसंगामुळे अर्जुन आणि सायलीमधील नातं हळूहळू बहरलेलं मालिकेत पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :जुई गडकरीमराठी अभिनेताटिव्ही कलाकार