Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री निशी सिंह यांचे निधन, दोन दिवसांपूर्वीच 50वा वाढदिवस साजरा केला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 22:03 IST

निशी सिंह यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये कामे केली आहेत.

Nishi Singh Passes Away: 'हिटलर दीदी', 'कुबूल है', 'इश्कबाज' आणि 'तेनाली रामा' यांसारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये अभिनय केलेल्या अभिनेत्री निशी सिंह यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच निशी यांनी आपला 50वा वाढदिवस साजरा केला होता. 50व्या वाढदिवसाच्या दोन दिवसानंतर म्हणजेच आज दुपारी 3च्या सुमारास त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 

दोन दिवसांपूर्वीच वाढदिवसया वर्षी मे महिन्यात निशी सिंह यांना पक्षाघाताचा झटका आला होता, तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. निशी सिंह यांचे पती, लेखक आणि अभिनेते संजय सिंग भादली यांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. ETimes शी बोलताना ते म्हणाले, "3 फेब्रुवारीला दुसरा स्ट्रोक आल्यानंतर (पहिल्या स्ट्रोकच्या एका वर्षानंतर), निशी हळुहळू बरी होत होती. मात्र, मे 2022 मध्ये त्यांना आणखी एक आजार झाला आणि त्यांची प्रकृती ढासळू लागली. गेल्या काही आठवड्यांपासून घशाच्या गंभीर संसर्गामुळे त्यांना खाणेही कठीण झाले होते. 16 सप्टेंबर रोजी निशीचा 50वा वाढदिवस झाला होता. ती बोलू शकत नव्हती, पण खुश दिसत होती.'

उपचारासाठी घर-गाडी विकलीते पुढे म्हणाले, 'निशीने खूप संघर्ष केला, पण शेवटी ती हरली. दोन वर्षांपूर्वीच तिची प्रकृती खालावली होती. आम्ही कुठे कामही करू शकत नव्हतो, त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती बिघडली. उपचारासाठी आम्ही अनेकांना आर्थिक मदतही मागितली होती. सुरभी चंदना मदतीसाठी पुढे आल्या. मी इंडस्ट्रीतील काही लोकांची मदत घेतली. मात्र, मार्चमध्ये खर्च भागविण्यासाठी मला माझे घर आणि गाडी विकावी लागली, आता सगळं संपलं.'

टॅग्स :टेलिव्हिजनमृत्यू