Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यातला बेस्ट निर्णय! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला साखरपुडा, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 11:23 IST

सोशल मीडिया स्टार असलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने साखरपुडा केेला आहे. अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि इन्फ्ल्यूएन्सरने साखरपुडा करुन सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे दीक्षा काटकर. दीक्षाने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन ही खास बातमी सर्वांना सांगितली आहे. दीक्षाच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होताच सर्वांनी तिचं अभिनंदन करुन दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. दीक्षा आता लग्न कधी करणार याची सर्वांना उत्सुकता आहे. दीक्षाने चॉकलेटी रंगाची साडी नेसली होती. तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता आणि त्यावर जॅकेट चढवलं होतं. विशेष म्हणजे जॅकेटमध्ये असलेल्या खिशात त्याने गुलाबाचं फुल ठेवलं होतं. दोघांनी मस्तीखोर आणि रोमँटिक अंदाजात खास फोटोशूट केलं. आयुष्यातील बेस्ट निर्णयाशी मी आता गाठ बांधली आहे, असं खास कॅप्शन दिक्षाने या फोटोला दिलं. 

दीक्षाने फोटो शेअर करताच तिचे मित्र-मैत्रिणी आणि इंडस्ट्रीतल्या कलाकारांनी तिचं अभिनंदन केलं. दीक्षाला आपण मराठी मालिका, सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. 'श्यामची आई', 'ऑल इज वेल' अशा मराठी सिनेमांमध्ये दीक्षाने काम केलं आहे. परंतु अलीकडच्या काळात एक सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर म्हणून दीक्षाने नाव कमावलं आहे. दीक्षाचे रिल आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एकूणच साखरपुडा करुन दीक्षाने तिच्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi actress Deeksha Katkar announces engagement, shares photos

Web Summary : Popular Marathi actress Deeksha Katkar announced her engagement with photos on social media. She wore a chocolate saree, her fiancé a blue kurta. She captioned the photos, 'Best decision of my life'. Fans are eager for wedding details.
टॅग्स :लग्नटेलिव्हिजनटिव्ही कलाकारबॉलिवूड