Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध अभिनेत्याचा लोणावळ्याजवळ अपघात; पिकनिकला जाणं पडलं महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 10:24 IST

Akash Chaudhari: पावसाळा असल्यामुळे ही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आकाश त्याच्या पाळीव श्वानासोबत लोणावळ्याला निघाला होता.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आकाश चौधरी (Akash Chaudhari) याचा मोठा अपघात झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आकाशच्या कारचा मोठा अपघात झाला असून यात त्याच्या कारचं प्रचंड नुकसान झालं आहे. सुदैवाने आकाशला फार मोठी दुखापत झाली नाही. त्यामुळे तो सुखरुप आहे.

पावसाळा असल्यामुळे ही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आकाश त्याच्या पाळीव श्वानासोबत लोणावळ्याला निघाला होता. नवी मुंबईवरुन तो लोणावळ्याच्या दिशेने जात असताना एका भरधाव ट्रकने त्याच्या कारला मागून धडक दिली. ज्यात आकाशच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे.

"मी माझ्या पाळीव श्वानासोबत व्हेकेशनसाठी जात होतो. वाटेत जात असताना एका ट्रकने माझ्या कारला मागून जोरात धडक दिली. माझी गाडी माझा ड्रायव्हर चालवत होता. आणि, मी माझ्या श्वानासोबत मागे बसलो होतो. या धडकेमुळे आम्ही एकदम घाबरलो आणि काही वेळासाठी एकदम शॉक्ड झालो", असं आकाश म्हणाला.

दरम्यान, आकाश छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. भाग्यलक्ष्मी या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. इतकंच नाही तर २०१६ मध्ये त्याने मिस्टर इंडियाचा खिताबही जिंकला आहे. आकाश स्प्लिट्सविला १० मध्येही सहभागी झाला होता. तसंच त्याचा सोशल मीडियावरही खूप मोठा चाहतावर्ग आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीअपघात