Join us

हॉस्पिटलबाहेर पडताच 'बिग बॉस'फेम अभिनेत्यावर हल्ला; सांगितला भयावह अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 14:26 IST

Priyank sharma: ३० जुलै रोजी प्रियांक त्याच्या आई-वडिलांसोबत चेकअपसाठी रुग्णालयात केला होता. यावेळी रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर अचानक एक व्यक्ती त्याच्या दिशेने आली आणि तिने प्रियांकला मारायला सुरुवात केली.

 'बिग बॉस ११'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रियांक शर्मा Priyank Sharma) सध्या चर्चेत आला आहे. आपल्या आई-वडिलांसोबत रुग्णालयातून बाहेर पडत असताना प्रियांकवर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. या प्रकरणी प्रियांकने पोलिस तक्रार दाखल केली असून याप्रकरणी तपास सुरु आहे.  एका मुलाखतीत प्रियांकने याविषयी भाष्य केलं आहे.

३० जुलै रोजी प्रियांक त्याच्या आई-वडिलांसोबत चेकअपसाठी रुग्णालयात केला होता. यावेळी रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर अचानक एक व्यक्ती त्याच्या दिशेने आली आणि तिने प्रियांकला मारायला सुरुवात केली. समोरच्या व्यक्तीने अचानकपणे केलेल्या हल्ल्यामुळे प्रियांक गोंधळून गेला. मात्र, वेळीच प्रसंगाचं भान राखत त्याने या इसमाचे हात धरले. हा प्रकार पाहून रुग्णालयातील अन्य दोन जण प्रियांकच्या मदतीसाठी धावून आले. परंतु, या दोन लोकांना येताना पाहून हा हल्लेखोर पळाला.

ज्या व्यक्तीने माझ्यावर हल्ला केला तो घटनास्थळावरुन फरार झाला. त्यानंतर मी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. तसंच माझ्या मदतीला धावून आलेल्या लोकांचेही मनापासून आभार, असं प्रियांक म्हणाला.

दरम्यान, या प्रकरणी प्रियांकवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीविरोधात कलम ३२३ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे करण्यात आलेल्या तपासामध्ये प्रियांकवर हल्ला करणारा व्यक्ती त्यांच्याच नात्यातील असल्याचं समोर आलं. रुग्णालयामध्ये प्रियांक आणि त्याच्या नातेवाईकांचं भांडण झालं. याच भांडणामुळे या नातेवाईकाने प्रियांकवर हल्ला केला. 

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन