Join us

लक्झरी गाड्या, घर फक्त दिखाव्यासाठी, प्रत्यक्षात...;एल्विश यादवच्या वडिलांनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 10:43 IST

Elvish yadav father: एल्विश त्याच्या युट्यूब चॅनेलवर अनेकदा लक्झरी गाड्यांसोबत दिसायचा. मात्र, या गाड्या त्याच्या स्वत:च्या नसून त्याच्याविषयी एक वेगळंच सत्य समोर आलं आहे.

Bigg boss OTT 2 विजेता आणि युट्यूबर एल्विश यादव सध्या रेव्ह पार्टी प्रकरणामुळे चर्चेत आहे. रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष पुरवल्याप्रकरणी त्याला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. इतकंच नाही तर एल्विशने त्याचा गुन्हा मान्य केल्यामुळे त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्येच आता त्याच्याविषयीचे अनेक धक्कादायक खुलासे समोर येत असून त्याच्या वडिलांनी आता एक मोठा खुलासा केला आहे.

अलिकडेच एल्विशच्या आई-वडिलांनी 'आजतक'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याच्या वडिलांनी एल्विशविषयी मोठा खुलासा केला आहे. यात एल्विशने त्याच्या युट्यूब चॅनेलवर जो काही स्टारडम जपला होता. तो सगळा खोटा आहे. एल्विशकडे कोणतीही महागडी कार किंवा आलिशान घर नसल्याचा धक्कादायक खुलासा त्याच्या वडिलांनी केला आहे. 

नेमकं काय आहे एल्विशच्या लक्झरी लाइफचं सत्य

एल्विश त्याच्या व्हिडीओमध्ये ज्या कार किंवा अन्य लक्झरी गोष्टी दाखवायचा त्या खरोखर त्याच्या नव्हत्या. बऱ्याचदा तो व्हिडीओ शूट करण्यासाठी त्याच्या मित्रांकडून कार उधार घ्यायचा. त्या गाड्या परत करण्यापूर्वी तो त्यांच्यासोबत व्हिडीओ शूट करायचा. त्याच्याजवळ कोणतीही संपत्ती नाही. त्याच्या नावावर जमीन, अपार्टमेंट असं काहीही नाही. दुबईमध्ये सुद्धा त्याचं घर नाहीये. तो फक्त त्याचं युट्यूब चॅनेल आणि जॅकेटची ऑनलाइन विक्री यातूनच कमाई करत होता.

एल्विशने कबूल केला गुन्हा

रेव्ह पार्टीत एल्विशने सापांचं विष पुरवल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. मात्र, सुरुवातीला तो गुन्हा कबूल करत नव्हता. मात्र, पोलिसांनी त्याची कठोर चौकशी केल्यानंतर अखेर त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. त्यामुळे सध्या तो १४ दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारबिग बॉससेलिब्रिटी